मुंबई
laxmikant berde मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर आणि दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची मैत्री आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. आपल्या अभिनयातून आणि विनोदी शैलीतून या दोघांनीही अनेक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले. पडद्यावर हास्याची बरसात करणाऱ्या या कलाकारांमधील मैत्रीचे नातेही तितकेच घट्ट आणि भावनिक होते. नुकत्याच एका मुलाखतीत सचिन पिळगांवकर यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी संबंधित एक हृदयस्पर्शी आठवण सांगितली. ‘नवरा माझा नवसाचा’ या लोकप्रिय चित्रपटात लक्ष्मीकांत यांना महत्त्वाची भूमिका द्यायची होती; मात्र, त्यांच्या आजारपणामुळे ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. हा प्रसंग आठवताना सचिन पिळगांवकर भावूक झाले.
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याविषयीच्या भावना व्यक्त करताना सचिन पिळगांवकर म्हणाले, “लक्ष्या आजही माझ्यात जगतो, इतका तो माझा चांगला मित्र होता.” लक्ष्मीकांत आज आपल्यात असते, तर त्यांनी आणखी अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले असते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. दोघांच्या मैत्रीतील जिव्हाळा आणि लक्ष्मीकांत यांच्याविषयी असलेली आत्मीयता त्यांच्या या शब्दांतून स्पष्ट होते.
सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाच्या निर्मितीच्या काळात लक्ष्मीकांत बेर्डे रुग्णालयात उपचार घेत होते. आजारपणामुळे त्यांना काम करता येत नव्हते. त्यांच्याकडे कोणताही नवीन चित्रपटही नव्हता. अशा कठीण परिस्थितीत सचिन यांनी आपल्या मित्राची भेट घेतली आणि त्याला चित्रपटात काम करण्याची विनंती केली. मात्र, प्रकृतीच्या कारणामुळे लक्ष्मीकांत यांच्यासमोर काम करण्याबाबत अनिश्चितता होती.
मित्राच्या आजारपणाची laxmikant berde जाणीव असूनही सचिन यांनी त्यांना धीर दिला. “मी थांबतो तुझ्यासाठी, काहीच काळजी करू नकोस,” असे आश्वासन त्यांनी लक्ष्मीकांत यांना दिले होते. सचिन यांच्या या शब्दांनंतर लक्ष्मीकांत यांच्या डोळ्यांत चमक आली होती. मात्र, काही काळानंतर त्यांनी सचिन यांना पुन्हा बोलावून आपल्या प्रकृतीविषयी महत्त्वाची गोष्ट सांगितली. डॉक्टरांनी पूर्वीप्रमाणे मेहनत करणे आता शक्य होणार नसल्याचे सांगितले आहे, त्यामुळे आपल्यासाठी चित्रपटाचे काम थांबवू नये, अशी विनंती त्यांनी सचिन यांना केली.
‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटातील बाबू कालिया ही व्यक्तिरेखा मूळतः लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासाठी विचारात घेण्यात आली होती. अखेरीस ही भूमिका अभिनेते प्रदीप पटवर्धन यांनी साकारली. चित्रपटाच्या कथानकात या व्यक्तिरेखेला महत्त्वाचे स्थान होते. लक्ष्मीकांत यांनी ही भूमिका केली असती, तर आपल्या खास विनो