नागपूर,
The Blind Relief Association दि ब्लाईंड रिलीफ असोसिएशनच्या मुंडले इंग्लिश मिडियम स्कूलमधील इयत्ता तिसरीचा विद्यार्थी मास्टर आराध्य खंडेश्वर याने आंतरशालेय कथाकथन स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.धरमपेठ एज्युकेशन सोसायटीच्या आर. एस. मुंडले इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजतर्फे २९ सप्टेंबर २०२६ रोजी ‘द नॅरेटिव्ह नूक’ या आंतरशालेय कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत आराध्यने उत्कृष्ट कथाकथन व सादरीकरण कौशल्याच्या जोरावर उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले. त्याला प्रमाणपत्र व चषक देऊन गौरविण्यात आले.आराध्यच्या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष मकरंद पांढरीपांडे, सचिव नागेश कानगे, मुख्याध्यापिका मंजुल मेहता, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मेघा पाध्ये, पर्यवेक्षिका शिल्पा डोंगरे तसेच शिक्षकवृंदाने त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सौजन्य:निकिता कायरकर,संपर्क मित्र