मुंबई
tiger shroff बॉलिवूडमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर मुंबईतील जुहू परिसरात गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत टायगर श्रॉफसह एकूण तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे

.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी हा गोळीबार केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, हल्लेखोरांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.