IAS होऊ नका! तुकाराम मुंढेंच्या ह्या सल्ल्याने सगळेच अवाक

    दिनांक :18-Oct-2026
Total Views |
 मुंबई,
tukaram-mundhe-youth-adviceसध्या आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची संपूर्ण राज्यासह देशभर चर्चा आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दररोज भेसळयुक्त, अस्वच्छता असणाऱ्या हॉटेलवर कारवाई झाल्याची माहिती समोर येत आहे. याचदरम्यान, पिंपरी चिंचवडमध्ये ग्लोबल मराठा बिझनेस एक्स्पोच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
 
ias
 
सात सेकंदांच्या आयुष्यात गुंतलेल्या तरुण पिढीला अर्थात झेनजीला आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंनी तिखट सल्ला दिला. तरुणाईच्या बदलत्या या मानसिकतेवर मुंढेंनी सडेतोड प्रहार केला. तरुण पिढी ज्ञानी आहे, त्यांना माहितीचा साठा एका क्लिकवर उपलब्ध ही होतो, ते खूप वेगवान आहेत. पण त्यांना थांबायचं म्हटलं की त्रास होतो. त्यामुळं ते मर्यादित आहेत. त्यांचं 'अटेंशन स्पॅम, खूप कमी आहे. प्रत्येकच प्रश्नाचं उत्तर सात सेकंदात मिळत नाही. पण तुमच्या आमच्या आजच्या समस्यांचं उत्तर मात्र त्या सेकंदात कधीचं मिळू शकत नाही. त्यामुळं यश कधीही घाईने किंवा काही क्षणात मिळत नसते, त्यासाठी चिकाटी आणि सातत्याची गरज असते.
 
तरुणांच्या भविष्यासाठी मुंढेंनी तिखट सल्ला दिला. मी या पिढीसाठी काही करायचं ठरवलं तर मी सांगेन की कॅरॅक्टर बिल्टअप करा, असा मोलाचा सल्ला दिला. तसेचं माझ्या मुलांनी मला आयएएस होऊ का? असं विचारलं तर मी त्यांना आयएएस होऊ नका, असं म्हणेन. तुकाराम मुंढेंचे हे उत्तर ऐकून अनेकांना धक्का बसला. पिंपरी चिंचवडमध्ये ग्लोबल मराठा बिझनेस एक्स्पोमध्ये तुकाराम मुंढे बोलत होते