वर्धेतील पाणीपुरवठा पाच दिवस बंद

    दिनांक :18-Oct-2026
Total Views |
वर्धा,
wardha water supply महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पिपरी मेघेसह १४ गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा २१ ऑटोबरपासून सलग ५ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तांत्रिक कामासाठी हा शटडाऊन घेण्यात येणार असून संबंधित गावातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासह दैनंदिन वापरासाठी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केले आहे.

wardha water supply to remain shut for 5 days from october 21, 14 villages affected
 
 
समृद्धी महामार्गावरील इंटरचेंज क्रमांक ४ येळाकेळी परिसरात ७०० मिमी व्यासाची डटाइल आयर्न (डीआय) जलवाहिनी क्रॉसिंग करून सध्याच्या मुख्य कच्च्या पाणी उपसा जलवाहिनीला जोडण्याचे काम करण्यात येणार आहे. हे काम तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीचे असल्याने ते सुरक्षितपणे पूर्ण करण्यासाठी मुख्य जलवाहिनीतून होणारा पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पिपरी (मेघे), कारला, साटोडा, आलोडी, नालवाडी, म्हसाळा, वरूड, सिंदी-मेघे, उमरी (मेघे), सावंगी (मेघे), बोरगाव (मेघे), वायगाव (निपाणी) आणि सेलू (काटे) या गावांतील पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे. संबंधित गावातील नागरिकांनी २१ ऑटोबरपूर्वी पुढील चार ते पाच दिवसांच्या गरजेनुसार पिण्याचे तसेच दैनंदिन वापराचे पाणी साठवून ठेवावे, असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे. जलवाहिनीचे क्रॉसिंग आणि जोडणीचे काम पूर्ण झाल्यानंतर आवश्यक तांत्रिक तपासणी करण्यात येईल. त्यानंतर पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत केला जाणार आहे. त्यामुळे काही भागांत नियमित पाणीपुरवठा सुरू होण्यास आणखी वेळ लागू शकतो. या आवश्यक कामासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता दीपक धोटे यांनी केले आहे.
आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा?
दरम्यान, पिपरीसह १४ गावांना पाणीपुरवठा करणार्‍या धाम जलाशयात सध्या केवळ ७० टके जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईची शयता व्यत केली जात आहे. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहे. परिणामी, ऑटोबर महिन्याच्या अखेरीस पिपरीसह १४ गावांमध्ये आठवड्यातून केवळ एकदाच पाणीपुरवठा करण्याचा निर्णय होण्याची शयता असल्याची माहिती आहे.