नवी दिल्ली,
brij-bhushan-elon-musk-cjp-protest-claimउत्तर प्रदेशच्या कैसरगंजचे माजी खासदार भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांनी मोठा दावा केला आहे. सीजेपीच्या लहरा दो तिरंगा आंदोलनावर बृजभूषण शरण सिंह यांनी टीका केली आहे. अमेरिकन उद्योजक एलॉन मस्क हे दिल्लीतील लहरा दो तिरंगा मार्चला जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं. सुप्रीम कोर्टाला धमकावण्यासाठी मोर्चा काढला गेला, असं देशात कधी झालं नव्हतं. हे आंदोलन देशाविरोधात षडयंत्र असल्याचा दावा देखील एलॉन मस्क यांनी केला.
बृजभूषण शरण सिंह यांनी सीजेपीच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना ते आंदोलन एलॉन मस्कच्या इशाऱ्यावर होत असल्याचा दावा केला. अमेरिकेतली उद्योक एलॉन मस्क यांच्या इशाऱ्यावर आंदोलन होत आहे. हे आपल्या देशाविरोधात मोठं षडयंत्र आहे. आता देशाची तुलना बांगलादेश आणि पाकिस्तानसोबत होतेय, असंही त्यांनी म्हटलं.
देशात पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाला धमकावण्यासाठी मोर्चा काढला गेला असा दावा देखील त्यांनी केला. देशात यापूर्वी असं घडलं नव्हतं, असंही बृजभूषण शरण सिंह म्हणाले. विदेशी उद्योजकांना त्यांच्या अटींवर भारतात व्यवसाय करायचा आहे, ते लोक या आंदोलनाला बळ देतोयत असा आरोप देखील भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांनी केला.
दिल्ली पोलिसांनी अभिजीत दीपके यांना नोटीस देत कनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कवर आंदोलन करु नये असं म्हटलं होतं. मात्र, त्या आंदोलनासाठी अभिजीत दीपके घरातून एकटे निघाले होते. दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. दुसरीकडे AISA च्या राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा यांना देखील ताब्यात घेणं आलं आहे. मंडी हाऊस येथून नेहा बोरा यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं. ही भारत वाचवण्याची लढाई असून तिहारमध्ये पाठवा, असं नेहा बोरा हिनं पोलिसांनी ताब्यात घेताच म्हटलं.