सुधाकर कोहळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा : अंब्रीशराव आत्राम

अहेरीत भव्य पदवीधर मेळावा

    दिनांक :19-Oct-2026
Total Views |
अहेरी
sudhakar-kohale भाजपचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन माजी राज्यमंत्री राजे अब्रीशराव आत्राम यांनी केले. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पृष्टभूमीवर इंडियन फक्शन हॉल अहेरी येथे भव्य पदवीधर मेळावा उत्साहात संपन्न झाला. यावेळी कार्यकत्यार्ंना संबोधित करताना बोलत होते.
 

kohale
कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी भाजपचे पदाधिकारी, ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते आणि पदवीधर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना आत्राम म्हणाले की, पदवीधरांच्या अडीअडचणी समजून घेणारे आणि त्यांच्या प्रश्‍नांना न्याय मिळवून देण्यासाठी विधान परिषदेत आवाज उठवणारे नेतृत्व सभागृहात पोहोचणे आवश्यक आहे. पदवीधरांच्या समस्या आणि अपेक्षा समजून घेऊन त्यांचे प्रश्‍न मांडणारे सुधाकर कोहळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
येत्या 23 तारखेला होणार्‍या मतदानात पदवीधर मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधाकर विट्ठलराव कोहळे यांना भरघोस मतांनी विजयी करावे, असेही त्यांनी सांगितले. पदवीधरांचे प्रश्‍न आणि त्यांचे हक्क यांना विधान परिषदेत प्रभावीपणे मांडण्यासाठी सक्षम नेतृत्वाला संधी देणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
मेळाव्यादरम्यान राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधत निवडणूक प्रचाराचे नियोजन, बूथ स्तरावरील संघटनात्मक बांधणी आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांबाबत चर्चा केली. निवडणुकीच्या पृष्टभूमीवर प्रत्येक कार्यकर्त्याची भूमिका महत्त्वाची असून, सर्वांनी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करत प्रचाराला गती द्यावी, असेही आवाहन त्यांनी केले.
या मेळाव्याला भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, कुमार अवधेशराव बाबा आत्राम, आमदार बंटी बांगडीया, माजी खासदार अशोक नेते, बाबुराव कोहळे, माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेव ऊसेंडी, बबलू हकीम, प्रशांत कुत्तरमारे, प्रकाश गेडाम, संतोष मद्दीवार यांच्यासह पाचही तालुक्याचे तालुकाध्यक्ष उपस्थित होते.