इरा राऊतचे एकाच दिवशी सहा विश्वविक्रम

    दिनांक :19-Oct-2026
Total Views |
बुलढाणा
world records बुलढाण्याची कन्या इरा आदित्य राऊत हिने वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी समुद्राच्या पाण्याखाली साहसी कामगिरी करीत एकाच दिवशी सहा विश्वविक्रमांची नोंद केली.
 
ira
जगातील सर्वांत कमी वयाची पात्र स्कूबा डायव्हर बनण्याचा मान मिळविणार्‍या इराने आपल्या यशाने जिल्ह्याची मान उंचावली आहे. इरा ही भारतीय नौदलात कार्यरत कमांडर स्नेह बुडाकोटी आणि कमांडर आदित्य राऊत यांची कन्या असून, कर्नाटकातील कारवार येथील नेव्हल चिल्ड्रन स्कूलमध्ये पाचव्या वर्गात शिकते.
 
१८ ऑटोबर रोजी वयाच्या दहाव्या वर्षी १७ तास आणि ३५ मिनिटांमध्ये तिने ही कामगिरी केली. अंदमान-निकोबार द्वीपसमूहातील शहीद द्वीप येथील डाइव्ह ट्राइब सेंटर मध्ये तिचे स्कूबा डायव्हिंगचे उपक्रम पार पडले. स्कूबा स्कूल्स इंटरनॅशनल या संस्थेने तिच्या स्कूबा डायव्हिंग पात्रतेला प्रमाणित केले तर इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्सचे अरविंदर सिंह भट्टी यांनी तिच्या सहा विश्वविक्रमांची पडताळणी केली.