FDA ची धडक कारवाई; ऐन नवरात्रौत्सवात तुळजापुरातून भेसळयुक्त मिठाई

    दिनांक :19-Oct-2026
Total Views |
धाराशिव,
maharashtra-fda-raid-food-stock-seizedनवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम राबवली असून छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. संभाजीनगरमध्ये दोन मोठ्या कोल्ड स्टोरेजवर तर धाराशिवच्या तुळजापूर येथे मिठाई उत्पादकांवर छापा टाकण्यात आला.
 
sdfg
छत्रपती संभाजीनगर येथील कारवाई
FDA ने बिडकीन येथील *फ्रिओ वेअरहाउसिंग प्रा. लि. आणि गंगापूर तालुक्यातील शिवराई येथील मराठवाडा कोल्ड स्टोरेज प्रा. लि. या दोन ठिकाणी कोणतीही पूर्वसूचना न देता एकाच वेळी छापेमारी केली. या कारवाईत सुमारे सव्वा चार कोटी रुपये किमतीचा तब्बल 1 लाख 97 हजार 480 किलो संशयास्पद अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे.
 
 
तपासणीत काय आढळले?
– तापमान नियंत्रणासाठी आवश्यक फ्रीझर आणि चिलिंग यंत्रणा बंद अवस्थेत होती.
– कोल्ड रूमची देखभाल नव्हती, माल अस्ताव्यस्त साठवला होता.
– कीटक नियंत्रण आणि स्वच्छतेचे नियोजन नव्हते.
– कर्मचाऱ्यांची वार्षिक वैद्यकीय तपासणी झालेली नव्हती.
 
 
तुळजापूर येथील कारवाई –
तुळजापूर येथे FDA ने मिठाई दुकानांवर छापा टाकून ५१० किलो खवा, पेढे व कलाकंद जप्त केले, तर २१० किलो कलाकंद-पेढ्यांचा साठा जागीच नष्ट करण्यात आला.
तपासणीत धक्कादायक बाबी समोर आल्या –
– मिठाईमध्ये पामतेल व वनस्पती तेलाचा वापर
– बिगर दुग्धजन्य घटकांचा वापर
– उत्पादनावर उत्पादकाचे नाव, लेबल नाही
– खरेदी-विक्रीची बिले देखील उपलब्ध नाहीत