दांडियाचा आनंद ठरला अखेरचा; उड्डाणपुलावरून पडून तरुणाचा मृत्यू

कळमना परिसरातील मध्यरात्री अपघात

    दिनांक :19-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
nagpur accident नवरात्रोत्सवात गरबा-दांडिया खेळून आनंदात घरी परतणाऱ्या २२ वर्षीय युवकाचा उड्डाणपुलावरून खाली पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. यश श्यामसुंदर सावळ असे मृत युवकाचे नाव आहे. रविवारी (१८ ऑक्टोबर) पहाटेच्या सुमारास कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला. भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटल्याने युवक उड्डाणपुलावरून खाली पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
 

nagpur hit and run 57-year-old st employee killed by speeding car, driver flees 
यश सावळ हा वाठोडा रोडवरील गोपालकृष्णनगर येथील रहिवासी होता. छतरपूर फार्महाउस परिसरात आयोजित नवरात्रोत्सवातील गरबा-दांडिया खेळून तो घरी परतत होता. दरम्यान, चिखली चौकातून एचबी टाऊन चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर सर्जा बारजवळ, इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोरील उड्डाणपुलावर हा अपघात झाला. घटनेच्या रात्री कळमनाचे ठाणेदार प्रवीण काळे यांच्या पोलिस ठाण्याचे पथक nagpur accident गस्तीवर होते. त्यांना घटनास्थळी नागरिकांची गर्दी दिसली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता एक युवक गंभीर जखमी अवस्थेत आढळला. उपस्थित नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने वाहन चालवत असताना युवकाचे नियंत्रण सुटले आणि तो उड्डाणपुलावरून खाली पडला. जखमी यशला खासगी वाहनाने मेयो रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रात्री सुमारे दोन वाजता डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी कळमना पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.