नागपूरकरांनो, तयार राहा! आता अंडरग्राउंड मेट्रोचीही धाव

    दिनांक :19-Oct-2026
Total Views |
नागपूर,
nagpur-underground-metro-phase-3नागपूरकरांसाठी एक अतिशय चांगली आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. येणाऱ्या काही महिन्यात नागपूरकरांना सरकारकडून एक खास गिफ्ट मिळणार आहे. सध्या नागपुरात मेट्रोचा पहिला टप्पा कार्यरत असताना आणि मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचा निर्माण कार्य जोरात सुरू असतानाच, नागपूर मेट्रोनं एक मोठा निर्णय घेतला आहे. अशातच सरकार ने मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचा नियोजन सुरू केल्याची माहिती आहे. एबीपी माझाला मिळालेल्या अधिकृत माहितीप्रमाणे नागपुरात मेट्रोचा तिसरा टप्पा तब्बल 55 किलोमीटरचा राहणार असून त्यामध्ये कोराडी मार्गावर किमान 10 किलोमीटर चा भाग 'भूमिगत म्हणजेच अंडरग्राउंड मेट्रो'चा असणार आहे. त्यामुळे जगातील मोठ्या शहरांसारखीच 'अंडरग्राउंड मेट्रो' नागपुरात ही प्रत्यक्षात धावणार आहे.
 
 
under
दरम्यान, या अंडरग्राउंड मेट्रोचा शेवटचा टोक निश्चितच नागपूर जवळचं कोराडी देवस्थान असणार आहे. तर नागपूर शहरातून अंडरग्राउंड मेट्रो कुठून सुरू करावी, यासंदर्भात सध्या सर्वेक्षणाचा काम सुरू असल्याची माहिती नागपूर मेट्रोचे प्रोजेक्ट डायरेक्टर राजीव त्यागी यांनी दिली आहे.
 
दरम्यान, एवढेच नाही तर मेट्रोचा पहिला टप्पा पूर्णपणे कार्यरत असताना मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचा निर्माण कार्य सध्या जोरात सुरू असून 2027 च्या अखेरपर्यंत निर्माण कार्य पूर्ण होऊन मार्च 2028 मध्ये मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन होऊन नागपूरकरांना विस्तारित मेट्रो सेवेचा लाभ घेता येणार असल्याची माहिती ही राजीव त्यागी यांनी दिली.
 
 
-नागपूर मेट्रोचा 'तिसरा टप्पा' म्हणजेच 'फेज थ्री' 55 किलोमीटरचा असेल.
 
-त्यामध्ये 10 किलोमीटरचा भाग 'अंडरग्राउंड मेट्रो'चा असेल, तर उर्वरित भाग 'एलिव्हेटेड मेट्रो' स्वरूपात असेल.
 
-मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्यात उत्तर नागपूरचा मोठा भाग कवर केला जाईल.
 
-शिवाय नागपूर जवळ निर्माण होणारा 'नवीन नागपूर' तसेच 'नवीन विमानतळाला'ही मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याशी जोडले जाणार....
 
-ज्या 'इनर रिंग रोड'च्या अवतीभवती गेल्या काही वर्षात नागपूरचा विस्तार तीव्र गतीने झाला, त्या रिंग रोडवरही तिसऱ्या टप्प्यात मेट्रो 23 किलोमीटर धावणार आहे.
 
-मेट्रोचा पहिला टप्पा पूर्णपणे कार्यरत असून तो 40 किलोमीटरचा आहे.
 
-तर 44 किलोमीटरच्या दुसऱ्या टप्प्याचे निर्माण कार्य सध्या तीव्रतेने सुरू असून ते मार्च 2028 पर्यंत पूर्ण होणार आहे.