वैनगंगा नदीतून पोहत पिंगलेश्वरीचे दर्शन

    दिनांक :19-Oct-2026
Total Views |
भंडारा 
wainganga-river वैनगंगा नदीत पोहण्यासाठी जाणार्या काही जलतरणपटूंनी वैनगंगा नदीतून पोहत कोरंभी येथील पिंगलेश्वरी माता मंदिर गाठले.
 
river swim
पाण्याने तुडूंब दुथडी भरलेल्या नदीतून पोहत दर्शनाला जाण्याचा हा प्रवास म्हणजे साहस व भक्तीचा अनोखा संगम ठरला. कारधा येथील जुन्या पुलापासून सुरू झालेल्या या जलवारीत जलतरणपटूंनी सुमारे ५ किलोमीटर अंतर पोहून पार केले. या उपक्रमात १० ते १२ वर्षे वयोगटातील सौम्या राहुल गिर्हेपुंजे व शरयू दिनेश समरीत दोन्ही रा.जवाहरनगर दोन चिमुकल्या मुलींनी सुद्धा सहभाग घेत संपूर्ण अंतर यशस्वीपणे पार करून विशेष लक्ष वेधले. त्यांनी हे अंतर २ तास १० मिनीटात पोहून पार केले. या उपक्रमाबद्दल सर्व जलतरण पटूंचे कौतुक केले जात आहे.