वर्धा,
bor jungal safariबोर व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने २ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करून राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या वन्यजीव सप्ताहाचा शुभारंभ आणि जंगल सफारीचा श्रीगणेशा शुक्रवार, २ ऑक्टोबरला करण्यात आला.याप्रसंगी बोर व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक मंगेश ठेंगडी, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणचे सचिव संजय सरदार, सहायक वनसंरक्षक (कोअर) आशिष देशमुख, सहायक वनसंरक्षक (बफर) दत्तात्रेय लोंढे, वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन बोरकर, विजय पटेल (गुजरात), ऋषिकेश निमकाडे (नागपूर), राहुल हिरनवले (मुंबई), नीरज साठे (नागपूर), प्रवीण जैन, अनिकेत भोयर (नागपूर), ओंकार पुरंदरे (नागपूर) यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. जंगल सफारीच्या श्रीगणेशाप्रसंगी नागपूर येथून बोर व्याघ्र प्रकल्पाच्या जंगल सफारीसाठी आलेल्या पटेल कुटुंबीयांना बोर व्याघ्र प्रकल्प प्रशासनाच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
नवीन बोर वनपरिक्षेत्र कार्यालयाचे उद्घाटन, बोर व्याघ्र प्रकल्पाच्या चित्रफितीचे प्रदर्शन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शनिवार, ३ रोजी शाळांमध्ये वन्यजीव विषयावर पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व प्रश्नोत्तरे स्पर्धा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये पर्यावरण व वनसृष्टीबद्दल जनजागृती कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
४ रोजी सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत विद्यार्थी व पक्षीप्रेमींकरिता पक्षी निरीक्षण, ५ ऑक्टोबरला सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत वर्धा-बोरधरण दुचाकी रॅली व वनपरिक्षेत्राधिकारी हिंगणी-बोरधरण सायकल रॅली.६ रोजी विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धा, कर्मचारी, गाईड, जिप्सी चालकांकरिता फोटोग्राफी स्पर्धा, ७ रोजी गवत कुरण विकास कार्यशाळा व महिला सशक्तीकरण कार्यशाळा. ८ रोजी बक्षीस वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे.