दिपाली-अंजली राठोड यांची दिल्ली बाल संसदेसाठी निवड

    दिनांक :02-Oct-2026
Total Views |
नागपूर
Dr. Ambedkar College दीक्षाभूमीस्थित डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील विद्यार्थिनी व भगिनी दिपाली आणि अंजली श्रीपत राठोड यांची राष्ट्रीय पर्यावरण बाल संसद (RPBS) २०२६ साठी दिल्ली येथे निवड झाली आहे. विदर्भातून निवड झालेल्या त्या एकमेव दोन विद्यार्थिनी असून, महाराष्ट्रातील निवडक पाच विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा समावेश आहे.
 

67 
 
 
मानव रचना इंटरनॅशनल स्कूल आणि पर्यावरण गतिविधी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमासाठी देशभरातून ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातून ९५ प्रतिनिधींची निवड करण्यात आली. दिपाली व अंजली यांनी अनुक्रमे कॅबिनेट मंत्रालय व विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत निवडक ६८ विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळविले आहे. ७ ऑक्टोबर रोजी दिल्ली विधानसभेत त्यांना आपले विचार मांडण्याची संधी मिळणार आहे.या उल्लेखनीय निवडीबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे पदाधिकारी, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. दीपा पान्हेकर, विभागप्रमुख प्रा. विकास सिडाम, प्रा. विनीत झामरे यांच्यासह शिक्षकांनी दोन्ही भगिनींचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
सौजन्य:प्रफुल ब्राम्हणे ,संपर्क मित्र