नागपूर,
Folk Art Festival बालरंगभूमी परिषद नागपूर शाखेतर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या गुरुनानक भवनात ‘जल्लोष लोककलांचा’ स्पर्धा उत्साहात पार पडली. गोंधळ, पोवाडा, भारुड यांसह विविध लोककलांचे सादरीकरण बालकलाकारांनी केले.
एकल गायनात धनश्री खापरे प्रथम, लावण्या शंभरकर द्वितीय व ईतिशा पाठे तृतीय ठरली. एकल वादनात आरोह सरोदे, तर एकल नृत्यात जीविका येंडे प्रथम आली.समूहगीतामध्ये सारस्वत संगीत विद्यालय, तर समूह नृत्यात जगत पब्लिक स्कूलने प्रथम क्रमांक मिळविला.विजेत्यांना प्रशांत उमरेडकर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेची अंतिम फेरी लातूर येथे होणार असून, महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांतील बालकलाकार सहभागी होणार आहेत.
सौजन्य:रवींद्र भुसारी ,संपर्क मित्र