लव्हलिना बोरगोहेनला बॉक्सिंगमधील सुवर्णपदक

    दिनांक :02-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Lovlina wins gold in boxing २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत २ ऑक्टोबर हा दिवस भारतीय क्रीडाविश्वासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक ठरत आहे. आजच्या दिवसाची सुरुवात तिरंदाजीतील चमकदार सुवर्णपदकाने झाली आहे. महिलांच्या रिकर्व्ह सांघिक स्पर्धेत भारताच्या कुमकुम, कीर्ती आणि अंकिता या त्रिकुटाने अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाच्या महिला संघाचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले आणि भारताच्या मोहिमेची दमदार सुरुवात केली. याशिवाय रिकर्व्ह मिश्र सांघिक स्पर्धेत कुमकुम आणि धीरज या जोडीला सुवर्णपदकाच्या सामन्यात चीनच्या जो कडून पराभव पत्करावा लागला. सध्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या पदक तालिकेत भारत १२ सुवर्ण, २४ रौप्य आणि ३४ कांस्य पदकांसह एकूण ७० पदके मिळवून सहाव्या क्रमांकावर आहे.
 
 
234346
 
 
आज दिवसभरात भारतीय संघाचे लक्ष अनेक महत्त्वाच्या सुवर्णपदकाच्या सामन्यांवर केंद्रित असेल, ज्यामध्ये भारतीय महिला हॉकी संघाचा चीनविरुद्धचा सुवर्णपदकाचा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३:३० वाजता होणार आहे. तसेच बॉक्सिंगच्या रिंगमध्येही भारताचे सुवर्णपदक विजयासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. महिलांच्या ७५ किलो वजनी गटात लव्हलिना बोरगोहेन हिचा सामना चीनच्या बाओ झीयीशी होत असून, हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी १०:०० वाजता सुरू झाला आहे आणि यात लव्हलिनाने बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकत चिनी खेळाडूला पराभूत केले आहे.
 
बॉक्सर लव्हलिनाप्रमाणेच इतर भारतीय खेळाडूंकडूनही सुवर्णपदकांची मोठी प्रतीक्षा आहे. महिलांच्या ६५ किलो वजनी गटातील सुवर्णपदकाच्या सामन्यात भारतीय बॉक्सर परवीन हिचा सामना चायनीज तैपेईच्या चेन निएन-चिनशी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २:१५ वाजता होणार असून ती सुवर्णपदक जिंकेल अशी दाट अपेक्षा आहे. तसेच पुरुषांच्या ८० किलो वजनी गटातील सुवर्णपदकाच्या स्पर्धेत अंकुश पांघलचा सामना किम मिन-सेओंगशी होणार आहे, ज्यामुळे आज भारताच्या बॉक्सिंग पदकांमध्ये आणखी भर पडण्याची शक्यता आहे.