ॲडेनियम फुलविण्याचे तंत्र शिकण्याची संधी

    दिनांक :02-Oct-2026
Total Views |
नागपूर,
Nagpur Garden Club Adenium Workshop नागपूर गार्डन क्लबतर्फे बागकामाची आवड असणाऱ्या तसेच रोपप्रेमींसाठी ॲडेनियम (डेझर्ट रोज) या आकर्षक फुलझाडावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा ९ व १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत वेस्ट हायकोर्ट रोड येथील नागपूर गार्डन क्लबच्या कार्यालयात होणार आहे.
 

ado 
 
 
 
कार्यशाळेत ॲडेनियमची लागवड, संगोपन, छाटणी, आकार देणे तसेच भरपूर फुलांसाठी आवश्यक तंत्रांची प्रात्यक्षिकासह माहिती तज्ज्ञांकडून देण्यात येणार आहे. नवशिक्यांसह अनुभवी रोपप्रेमींसाठीही ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.
सौजन्य:नितीन दाते,संपर्क मित्र