१५० हून अधिक दुकानदार व ग्राहकांना १ हजार ५०० कापडी पिशव्यांचे वाटप

    दिनांक :02-Oct-2026
Total Views |
नागपूर,
nagpur-plastic-free-campaignराष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत शुक्रवारी (ता. २) रोजी नागपूर महानगरपालिकेच्या झोन क्र. ०२, प्रभाग क्र. १५ अंतर्गत गोकुळपेठ मार्केट येथे सिंगल-यूज प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत जनजागृती अभियान राबविण्यात आले.
 

free 
या अभियानामध्ये मनपाचे उपायुक्त श्री. राजेश भगत, सहायक आयुक्त श्री. राजकुमार मेश्राम,मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. गजेंद्र महल्ले, विभागीय अधिकारी श्री. लोकेश बासनवार, उपद्रव शोध पथक , तेजस्विनी महिला मंचच्या अध्यक्षा सौ. किरण मुंधडा, रोटरी क्लब ऑफ वायसीसीई महाविद्यालयाचे सदस्य तसेच पीयूआय टीमचे सदस्य सहभागी झाले.
 
अभियानादरम्यान गोकुळपेठ मार्केटमधील दुकानदार आणि ग्राहकांशी संवाद साधून सिंगल-यूज प्लास्टिकचा वापर टाळण्याचे तसेच त्याऐवजी पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचा वापरg करण्याचे आवाहन करण्यात आले. जनजागृतीचा संदेश नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने १५० हून अधिक दुकानदार व ग्राहकांना १,५०० कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
 
प्लास्टिकमुळे होणारे पर्यावरणीय नुकसान, सार्वजनिक ठिकाणी निर्माण होणारा कचरा आणि स्वच्छतेसमोरील आव्हाने याबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली. दैनंदिन जीवनात प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर कमी करून पुनर्वापर करता येणाऱ्या कापडी पिशव्यांचा स्वीकार करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
 
‘प्लास्टिकला नकार – कापडी पिशवीचा स्वीकार!’ आणि ‘स्वच्छ बाजारपेठ – निरोगी पर्यावरण!’ या संदेशातून स्वच्छता व पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याचा संदेश देण्यात आला.