नागपूर,
Pratapnagar Vidyalaya जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आनंदनगर स्पोर्ट्स असोसिएशनच्या मैदानावर आयोजित आंतरशालेय हॉलीबॉल स्पर्धेत प्रतापनगर माध्यमिक विद्यालयाच्या १४ वर्षांखालील मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी विवेकानंद नगर हिंदी हायस्कूलचा १५-१३, १५-९ असा पराभव केला.
दरम्यान, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने टीबीआरएस मुंडले शाळेविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात उपविजेतेपद मिळविले. खेळाडूंना प्रशिक्षक सुजल धुर्वे यांचे मार्गदर्शन लाभले. यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. गिरीश देशमुख, सचिव अनुपमा नाफडे, मुख्याध्यापिका सुनंदा गौरकर यांच्यासह शिक्षकांनी विजेत्या संघांचे अभिनंदन केले.
सौजन्य:विजय दाणी ,संपर्क मित्र