वर्धा
separate-vidarbha लढू, मरू, जेलमध्ये सडू पण डिसेंबर २०२७ पर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्याचा निर्धार विदर्भ राज्य आंदोलन समिती, शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी व्यक्त केला. स्थानिक कारला चौक येथील विठ्ठल रुक्मिनी सभागृहात आज २ रोजी विदर्भ राज्य जन संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी केले. मेळाव्याला माजी आमदार सरोज काशीकर, समितीच्या महिला आघाडी अध्यक्ष मंजुषा तिरपुडे, शैला देशपांडे, पुरुषोत्तम पाटील, डॉ. पि. आर. राजपूत, अरुण केदार, मुकेश मासुरकर आदी उपस्थित होते.
सर्व क्षेत्रात विदर्भ समृद्ध असतानाही विदर्भ पश्चिम महाराष्ट्राचे तुलनेत मागासलेला आहे, युवकांना रोजगाराच्या संधी नाही, राज्यातील नोकरीत अत्यल्प वाटा आहे, उद्योग नसल्याने बेरोजगारी आहे, सिंचनाच्या सुविधा नाही, परिणामी विदर्भात कोरडवाहू शेतकर्यांचा प्रदेश तयार झाला आहे, कुपोषण, शेतकरी आत्महत्या, महिलांची सुरक्षितता इत्यादी प्रशन निर्माण झाले आहे. नागरिकांचा आवाज मुंबईच्या मंत्रालयात पोहचत नाही म्हणून विदर्भ राज्य निर्माण करणे काळाची गरज आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करणे म्हणजे भारत देशात २९ राज्यांप्रमाणे ३० वे राज्य निर्माण करणे. दिवाळखोर महाराष्ट्र राज्यात पुन्हा १०० वर्ष राहीलो तरी विदर्भाचा विकास होणार नाही. म्हणून या लढ्यात विदर्भातील जनतेने, युवकांनी, महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी केले. मेळाव्याला माजी आमदार सरोज काशीकर, समितीच्या महिला आघाडी अध्यक्ष मंजुषा तिरपुडे, शैला देशपांडे, पुरुषोत्तम पाटील, डॉ. पि. आर. राजपूत, अरुण केदार, मुकेश मासुरकर यांनीही मार्गदर्शन केले.
व्यासपीठावर माजी मंत्री रमेश गजबे, राजसिंह ठाकूर, नरेश निमजे, विजय निवल, भास्करराव महाजन यांच्यासह सर्व जिल्ह्याचे प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रम पुर्वी सेवाग्राम येथून अॅड. चटप, मधुसूदन हरणे यांच्या नेतृत्वात शहरातील मुख्य रस्त्यांनी २०० चे वर मोटारसायकलची रॅली काढण्यात आली. त्यानंतर कारला रोड येथील विठ्ठल रुक्मिणी सभागृहात मेळावा झाला.