नागपूर,
Worker himself set fire to the garage कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बँक कॉलनी परिसरात देवेश होंडा गॅरेजला मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली. हे गॅरेज सतीश यादव यांच्या मालकीचे असल्याची माहिती आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गॅरेजमध्ये मिस्त्री म्हणून काम करणाऱ्या राजू महेंद्रकर याने रात्री सुमारे २ वाजताच्या सुमारास गॅरेजमध्ये आग लावून घटनास्थळावरून पळ काढल्याचा आरोप आहे. आगीत गॅरेजमधील साहित्याचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच कपिलनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आग लावण्यामागील कारणाचा शोध घेतला जात आहे.