नागपूर
rape registered against minor boy एकाच शैक्षणिक संस्थेत शिकणाऱ्या शाळकरी मुलासोबत महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीची मैत्री झाली. दोघांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. काही महिन्यात तरुणीने पोट दुखत असल्यामुळे आईसह डॉक्टरकडे चेकअपसाठी गेली. तरुणी गर्भवती असल्याचे निदान झाल्यामुळे आईच्या पायाखालची जमीन सरकली. हा प्रकार उघडकीस येताच अल्पवयीन मुलाविरुद्ध हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, आरोपी मुलाने तरुणीला आपल्या घरी बोलावून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. हा प्रकार २३ फेब्रुवारी ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी तरुणीची प्रकृती बिघडली. तिच्या आईने तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ती सुमारे नऊ आठवड्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत हुडकेश्वर पोलिसांनी १५ वर्षीय मुलाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२)(एम) तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम ४ आणि ६ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.
दोघांचे आईवडिल चिंतेत
मुलगा दहावीचा विद्यार्थी आहे तर तरुणी कॉलेजमध्ये पदवीचे शिक्षण घेत आहे. तरुणी आणि मुलगा एकमेकांकडे आकर्षित झाले. दोघांच्या भेटी वाढल्या. ती तरुणी मुलाच्या घरी नेहमी येत असल्यामुळे दोघांवर आईवडिलांना संशय आला नाही. मुलाचे वय लक्षात घेता असा प्रसंग ओढवणार, असा विचारही पालकांनी केला नव्हता. सध्यस्थितीत मुलगा आणि तरुणीचे पालक चिंतेत आहेत.