आंदोलन राजकारणाचे साधन बनणे धोक्याचे

सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन, रा. स्व. संघाचा विजयादशमी उत्सव व शस्त्रपूजन

    दिनांक :20-Oct-2026
Total Views |
नागपूर
sarsanghchalak-dr-mohanji-bhagwat समाजातील विविधतेचा स्वीकार करत राष्ट्रीय  एकात्मता अधिक दृढ करणे, भारतीय सांस्कृतिक मूल्यांचे जतन करणे, तरुण पिढीला व्यसनांपासून दूर ठेवणे आणि विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबत विवेकाधिष्ठित विकास साधणे, ही आजच्या काळातील महत्त्वाची आव्हाने आहेत. समाजातील समस्यांसाठी आंदोलन उभे राहणे, ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. याद्वारे समस्यांचे समाधान शोधण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. आंदोलनाचा उपयोग सवंग प्रसिद्धीसाठी आणि राजकीय स्वार्थासाठी होणे समाजासाठी घातक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
 

mohanji b 
रा. स्व. संघाच्या शताब्दी वर्ष समारोपाच्या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवादरम्यान रेशीमबाग मैदानावर ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ संपादक संजय गुप्ता, विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, विदर्भ प्रांत सह संघचालक श्रीधर गाडगे आणि नागपूर महानगर संघचालक राजेश लोया उपस्थित होते. या कार्यक्रमाला माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, इस्रायलचे राजदूत यानिव रेवाच, राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का हे विशेषत्वाने उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. परिणय फुके हेही गणवेशात उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. भागवत म्हणाले, सामाजिक समस्येतून आंदोलने उभी राहणे ही बाब स्वाभाविक आहे. शासन प्रशासनासह आंदोलनकत्यांनी आणि समाजाचे नेतृत्व करणाèया नेत्यांनी आपल्या कृतीतून समाजात विसंवाद, द्वेष निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. त्यांची कृती संविधान आणि कायद्याच्या चौकटीतच राहिली पाहिजे. बोलणे, वागणे आणि परस्परांशी व्यवहार करताना सभ्यतेची मर्यादा पाळली पाहिजे. सवंग लोकप्रियतेचा हव्यास आणि राजकीय लाभ घेण्याचा प्रकार विवेक आणि सद्भावनेवर हावी होता कामा नये, असा सूचक इशाराही सरसंघचालकांनी दिला.

भारतीय अस्मिता आणि भावनिक एकात्मतेवर भर
भारतीय संविधानाने देशातील नागरिकांना ‘आम्ही भारताचे लोक’ या भावनेतून एकत्र बांधले आहे. विविधतेने नटलेल्या समाजात भावनिक एकात्मता दृढ करणे ही केवळ घटनात्मक संकल्पना नसून ती प्रत्यक्ष जीवनात अनुभवण्याची बाब आहे, असे भाषणात स्पष्ट करण्यात आले. भारतीय तत्त्वज्ञानात सृष्टीतील विविधता आणि संपूर्ण अस्तित्वातील एकात्मता यांचा परस्परसंबंध मांडण्यात आला आहे. विविधता ही स्वाभाविक आणि परिवर्तनशील असली, तरी संपूर्ण अस्तित्वाची एकता हा शाश्वत सत्याचा आधार आहे.
या तत्त्वज्ञानाचा व्यवहारात स्वीकार न झाल्यामुळे भारताला दीर्घकाळ परकीय गुलामगिरी सहन करावी लागली, असे भाषणात नमूद करण्यात आले. अनेक संघर्ष आणि बलिदानांनंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाने पुन्हा एकदा एकता आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. मात्र, स्वातंत्र्य मिळविण्यासाठी झालेल्या त्यागाइतकीच, किंबहुना त्याहून अधिक बांधिलकी आता राष्ट्राच्या सर्वांगीण उभारणीसाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादनही सरसंघचालकांनी केले.

डिजिटल माध्यमांच्या वापरात विवेक आवश्यक
कुटुंब, शाळा आणि सामाजिक वातावरणातून नव्या पिढीला मिळणाèया संस्कारांचे प्रमाण कमी होत असल्याबद्दल भाषणात चिंता व्यक्त करण्यात आली. विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे माहितीचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला असला, तरी समाजमाध्यमे आणि डिजिटल व्यासपीठांवरून मिळणाèया माहितीचा योग्य-अयोग्य असा विवेक न करता स्वीकार केल्यास वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. ओटीटीसह विविध माध्यमांमधून उपलब्ध होणाèया माहितीविषयीही विचारपूर्वक भूमिका घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
नव्या पिढीला माहितीचे चिकित्सक मूल्यमापन करण्याची सवय लावणे आवश्यक आहे. या विवेकाच्या अभावामुळे जगभरातील तरुण अमली पदार्थांच्या व्यसनाच्या विळख्यात अडकत आहेे. अमली पदार्थांचे व्यसन ही गंभीर राष्ट—ीय समस्या बनली असून तिचा सामना करण्यासाठी शासन, प्रशासन आणि समाजाने वेळीच एकत्रित प्रयत्न सुरू करावेत. पालकांच्या सध्याच्या पिढीने तरुणांना योग्य-अयोग्याची जाणीव करून द्यावी, तर तरुणांनी व्यसनाधीनतेकडे नेणाèया प्रवृत्तींपासून स्वतःला दूर ठेवावे. देशभरातील संबंधित घटकांना एकत्र आणून अमली पदार्थांविरोधात व्यापक जनआंदोलन उभे करण्यासाठी स्वयंसेवक प्रयत्न करतील, असेही सरसंघचालक म्हणाले.