लग्नाचे आमिष दाखवून महिलेचा तीनदा गर्भपात

    दिनांक :20-Oct-2026
Total Views |
नागपूर
rape-case लग्नाचे आमिष दाखवून ३७ वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण करीत तिला तीन वेळा गर्भवती केले. प्रत्येक वेळी तिचा बळजबरी गर्भपात घडवून आणल्याचा आणि लग्नास नकार दिल्याचा आरोप असलेल्या ४६ वर्षीय युवराज माथनकर याच्याविरुद्ध प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 
rape
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, संबंधित महिलेची आरोपीशी तिच्या भावामार्फत ओळख झाली होती. पुढे या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. या काळात आरोपीने महिलेशी लग्न करण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप आहे. आरोपीने महिलेला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या संबंधांतून महिला तीन वेळा गर्भवती राहिली. प्रत्येक वेळी आरोपीने तिला रुग्णालयात नेऊन गर्भपाताची व्यवस्था केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, महिलेने आरोपीकडे लग्न करण्यासाठी तगादा लावल्यानंतर त्याने तिच्याशी मारहाण करून धमकी दिली आणि अखेर लग्न करण्यास नकार दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे प्रतापनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६९, ११५(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. आरोपीची पार्श्वभूमीही गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचे वृत्तात नमूद आहे. प्रकरणाचा पुढील तपास प्रतापनगर पोलीस करीत आहेत.