‘द व्हॉइस ऑफ ओल्ड’ लघुपटाच्या बालकलाकार आणि दिग्दर्शकाचा सत्कार

    दिनांक :21-Oct-2026
Total Views |
वर्धा
the-voice-of-old ‘द व्हॉइस ऑफ ओल्ड’ या लघुपटाचा बालकलाकार सार्थक चव्हाण व दिग्दर्शक व निर्माते आदेश ढगे यांचा केळकरवाडी येथील सरस्वती विद्या मंदिर मराठी माध्यम उच्च प्राथमिक शाळेत सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे बालकलाकार सार्थक चव्हाण हा सरस्वती विद्या मंदिरचा विद्यार्थी आहे.
 

short film
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश देशपांडे, सचिव संजय जलताडे, कोषाध्यक्ष मदन परसोडकर व मुख्याध्यापक दिनेश शेंडे उपस्थित होते.
 
वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागातून सुरू झालेला या चित्रपटाचा कलाप्रवास सातासमुद्रापार पोहोचला आहे. ही शाळेसाठी व संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. या लघुपटातील बालकलाकार सार्थक चव्हाण हा सरस्वती विद्यालयातील सहावीचा विद्यार्थी आहे. सार्थकने आपल्या अभिनयाने विशेष छाप पाडली आहे. कमी वयात सार्थकने आपल्या अभिनयातून प्रसिद्धी मिळविली आहे. त्याच्या यशाचा आम्हाला अभिमान असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यत केले.