नवरात्रीच्या जेवणातून विषबाधा, 300 हून अधिक बाधीत

लाखनी तालुक्यातील घटना

    दिनांक :21-Oct-2026
Total Views |
भंडारा,
food poisoning नवरात्र निमित्त आयोजित जेवणाच्या कार्यक्रमातून 300 च्या आसपास लोकांना विषबाधा झाल्याची घटना लाखनी तालुक्यातील खराशी येथे घडली. यातील जवळपास 82 जणांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते.
 

food poisoning at navratri feast affects over 300 people in bhandara district 
खराशी येथील जितेंद्र बोंद्रे यांच्याकडे नवरात्रानिमित्त जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील शेकडो जणांनी या प्रसादाचा लाभ घेतला. दरम्यान आज पहाटे यातील अनेकांना उलट्या, मळमळ आणि हगवणीचा त्रास सुरू झाला. हा प्रकार लक्षात येताच बाधितांवर खराशी, पालांदूर आणि भंडारा येथे उपचार सुरू झाले. जवळपास तीनशे जणांना हा त्रास झाला. अधिक त्रास असलेल्या 11 जणांवर भंडारा येथे, 51 रुग्णांवर पालांदूर येथे तर 20 जणांवर खराशी येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. एकूण 82 जण उपचार घेत असून यातील 36 महिला आहेत.
घटनेची माहिती मिळताच food poisoning  आरोग्य विभागाचे अधिकारी पथकासह दाखल झाले. आवश्यक त्यांना उपचार देणे सुरु केले. उपचार घेत असलेल्यांची प्रकृती धोक्या बाहेर असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. अन्नाचे नमुने घेऊन तपासणीसाठी नेण्यात आल्याचे समजते.