सोन्याचे दर घसरले! दिवाळीत आणखी स्वस्त?

    दिनांक :21-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली,
gold-price-drop-diwali-2026नवरात्री आणि दसऱ्याच्या दरम्यान सोन्याच्या दरातील घसरणीमुळं सोने खरेदी करणाऱ्यांची आशा वाढली आहे. दसरा - दिवाळीच्या दरम्यान भारतात सोन्याची खरेदी वाढते. यामुळं दरांमध्ये घसरण कायम राहिल्यास दागिने खरेदी करणाऱ्यांना फायदा होईल.सोन्याच्या दरांमध्ये आंतरराष्ट्रीय घडामोंडीमुळं निर्माण झालेला तणाव, कच्चा तेलाच्या दरातील वाढ, अमेरिकेच्या व्याज दरासंदर्भातील अनिश्चितता याचा सोन्याच्या दरावर परिणाम झाला आहे.
 

goldp
 
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील आकडेवारीनुसार सोन्याच्या दर 147300 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा दर 4138 डॉलर प्रति औंसवर आला आहे. डिसेंबरच्या वायद्याचे गोल्ड फ्युचर्सचे दर 4148.50 डॉलर्स प्रति औंसवर आला आहे. सोन्याच्या दरातील घसरणीचं प्रमुख कारण क्रूड ऑईलच्या दरातील वाढ हे आहे. आखाती देशांमधील वाढत्या भूराजनैतिक तणावामुळं तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार ब्रेंट क्रूड ऑईलचे दर 5 महिन्याच्या उच्चांकावर पोहोचले आहेत.
 
येमेनच्या इराण समर्थित हुती गटानं सौदी अरेबियाच्या ऊर्जा प्रकल्पांवर, विमानतळावर आणि सैन्य तळांवर हल्ले होत असल्यानं बाजारातील चिंता वाढली आहे. कच्चा तेलाचे दर वाढल्यानं ट्रान्सपोर्ट, उत्पादन खर्च वाढतो. यामुळं जगभरातील केंद्रीय बँका व्याज दरात कपात करण्यापासून लांब राहतात. सोने महागाई आणि आर्थिक अनिश्चिततेच्या काळात लोकप्रिय पर्याय मानला जातो. सोन्याचे आगामी काळातील दर निश्चित करण्यासाठी अमेरिकेच्या फेड रिझर्व्हची भूमिका महत्त्वाची ठरते.
 
गुंतवणूकदार 27 आणि 28 ऑक्टोबरला होणाऱ्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीकडे गुंतवणूकदारांचं लक्ष लागलेलं आहे. व्याज दर स्थिर राहिल्यास किंवा ते न वाढल्यास सोन्याच्या दरांना आधार मिळू शकतो. जर व्याज दर दीर्घकाळ उच्च राहणार असल्याचे संकेत मिळाल्यास सोन्याच्या दरावर दबाव पाहायला मिळू शकतो.