आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी

आतापर्यंत १४ सुवर्णपदके जिंकली

    दिनांक :21-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली,
india-asian-para-games-2026-medal-tally२०२६ च्या आशियाई पॅरा गेम्सला तीन दिवस उलटले असून, भारतीय खेळाडूंनी आधीच उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भारताने आतापर्यंत एकूण ६२ पदके मिळवली आहेत. दुसऱ्या दिवसापर्यंत भारताने ३५ पदके जिंकली होती. भारताने आतापर्यंत १४ सुवर्ण, २२ रौप्य आणि २६ कांस्य पदके जिंकली आहेत.
 
 
para
नागोया येथे सुरू असलेल्या पॅरा आशियाई खेळांच्या तिसऱ्या दिवशी शानदार कामगिरी पाहायला मिळाली. भारताने तिसऱ्या दिवशी एकूण ३४ पदके जिंकून आपल्या पदकतालिकेला ६२ वर नेले. यामध्ये १४ सुवर्ण, २२ रौप्य आणि २६ कांस्य पदकांचा समावेश आहे. दुसऱ्या दिवशी सुवर्णपदक जिंकणाऱ्या सिमरन शर्माने तिसऱ्या दिवशीही आणखी एक सुवर्णपदक पटकावले.
 
हानेने डिस्कस थ्रो एफ३७ प्रकारात कांस्य पदक जिंकले. हानेने ५७.०४ मीटरचा अंतिम प्रयत्न करून डिस्कस थ्रोमध्ये तिसरे स्थान पटकावले.
 
रोहित कुमारने जलतरणातील १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक एसबी४ प्रकारात कांस्य पदक जिंकले. शैलेशनेही पुरुषांच्या टी४२/टी६१/टी६३ लांब उडीत कांस्य पदक जिंकले.
 
शरथ मकानहल्लीने पुरुषांच्या १५०० मीटर टी१२/१३ प्रकारात कांस्य पदक जिंकले. शरथने ४:११.०१ वेळेसह तिसरे स्थान पटकावले.
 
भारताने जलतरणात आपले दुसरे पदक जिंकले असून, रवी बुडिगिनाने १०० मीटर बॅकस्ट्रोक एस१३ प्रकारात रौप्य पदक पटकावले आहे.
 
अकिरा बनोथूने 400 मीटर T35/38 शर्यतीत 51.32 सेकंदांची वेळ नोंदवून रौप्य पदक जिंकले.
 
हिमांशू नंदालने १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक एसबी११ मध्ये कांस्यपदक जिंकल्याने भारताकडे आता तीन कांस्यपदके आहेत.
 
करमज्योती दलालने महिलांच्या एफ55 थाळीफेक प्रकारात 21.60 मीटरच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह कांस्य पदक जिंकले.
 
सुखचैन धनकरने भालाफेक एफ55 प्रकारात 29.94 मीटर भाला फेकून भारतासाठी कांस्य पदक जिंकले.
सिमरन शर्माने टी१२ महिलांच्या १०० मीटर शर्यतीत १२.०२ सेकंदांची वेळ नोंदवून नवीन क्रीडा विक्रम प्रस्थापित केला आणि सुवर्णपदक जिंकले.
प्रणव देसाईने पुरुषांच्या १०० मीटर टी६४ शर्यतीत कांस्य पदक जिंकले. प्रणवने ११.९६ सेकंदांची वेळ नोंदवत तिसरे स्थान पटकावले.
पुरुषांच्या १०० मीटर टी४७ शर्यतीत भारताने सुवर्ण आणि रौप्य दोन्ही पदके पटकावली. दिलीप गवीतने १०.६९ सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले, तर मोरासिंगनाकथने १०.७२ सेकंदांची वेळ नोंदवत रौप्यपदक पटकावले.
रवी रोंगालीने पुरुषांच्या एफ40 गोळाफेक स्पर्धेत अंतिम फेरीत 10.02 मीटर गोळा फेकून तिसरे स्थान पटकावले आणि भारतासाठी कांस्य पदक जिंकले.
प्रीती पालने आणखी एक रौप्य पदक जिंकले आहे. प्रीतीने मंगळवारी २०० मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकले होते, आणि आज १०० मीटर शर्यतीत दुसरे स्थान पटकावून तिने आणखी एक रौप्य पदक मिळवले.
शुभम वाधवा आणि भावना पटेल या जोडीने पॅरा टेबल टेनिसच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.