सणासुदीत साखरेचा गोडवा महागला!

    दिनांक :21-Oct-2026
Total Views |
मुंबई,
india-sugar-price-surgeदेशात सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या महिन्यातही साखरेच्या दरात मोठी वाढ दिसून आली. देशातील 36 पैकी 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये साखरेच्या महागाईचा दर 30 टक्क्यापेक्षा जास्त झाला आहे. देशात साखरेचा किरकोळ महागाई दर ऑगस्टमधील 24.27 टक्क्यांवरून सप्टेंबरमध्ये 29.80 टक्के इतका झाला आहे. जानेवारी 2026 नंतरची ही सर्वोच्च पातळी मानली जात आहे.
 

suger23 
देशात राजस्थाननमध्ये 26.65 टक्क्यांवरून 25.15 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. राजस्थानमध्ये सप्टेंबर महिन्यात महागाईचा दर किंचिंत कमी झाला आहे. ऊसाच्या उत्पादनात घट झाली आहे. त्याचबरोबर एन निनोमुळे पाऊस यंदा कमी झाला. या पावसामुळे साखेरचा तुटवडा निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. मुंबईत एक किलो साखर 60 रुपयांना विकली जात आहे.
 
साखरेच्या वाढत्या किमतींमुळे संपूर्ण देश चिंतेत आहे. 21 राज्यांमध्ये साखर 30 टक्क्यांहून अधिक महाग झाली आहे. या राज्यांमध्ये साखरेच्या किमती गगनाला भिडत असून, यात ओडिशा आघाडीवर आहे. देशव्यापी साखरेचा किरकोळ महागाई दर ऑगस्टमधील 24.27 टक्केवरून सप्टेंबरमध्ये 29.80 टक्के पर्यंत वाढला. नवीन ग्राहक किंमत निर्देशांक मालिकेनुसार, जानेवारी 2026 नंतरची ही सर्वोच्च पातळी आहे.
 
शिवाय, किरकोळ बाजाराच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये घाऊक साखरेचा महागाई दर कमी झाला. डब्ल्यूपीआयच्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट 2026 मध्ये घाऊक साखर महागाईचा दर 16.29 टक्के होता. सप्टेंबर 2026 मध्ये तो 12.72 टक्के पर्यंत कमी झाला. घाऊक महागाईचा दर कमी झाला असला तरी, तो अजूनही गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या जास्त आहे.