MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार: मंत्री-अधिकाऱ्यांना फोनचा तगादा!

    दिनांक :21-Oct-2026
Total Views |
मुंबई,
mpsc-students-recruitment-protestदेशभरात नुकतंच गाजलेल्या विद्यार्थींच्या आंदोलनामुळे देशाचं राजकारण ढवळून निघालं आहे. तर तिकडे राज्यात पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी तब्बल 12 दिवस आंदोलन केले होते. एमपीएससी पेपरफुटीच्या चौकशीसाठी 5 सदस्यीय चौकशीची समितीच स्थापना करण्यासह अन्य मागण्या मान्य केल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. पेपरफुटी चौकशी समितीचे सचिव म्हणून अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा सरकारने केली आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी अल्पशी माघार घेतल्याचे दिसून आलं. मात्र असं असताना अद्याप या आंदोलनाची आणि एमपीएससी विद्यार्थ्यांची अनेक मंत्र्यांना धास्ती आहे का?असा प्रश्न आता विचारला जात आहे. त्यामागचं कारण म्हणजे भरती प्रकिया संदर्भात MPSC विद्यार्थ्यांचे अनेक मंत्री आणि अधिकाऱ्यांना फोन करत असल्याची माहिती आहे.
 
 
pouh
 
दरम्यान, अनेक खात्या अंतर्गत पदे रिकामी असताना, पदभरती कधी करणार असा सवाल विद्यार्थ्यांकडून करण्यात येत असल्याची माहिती आहे. विद्यार्थ्यांकडून संबंधित विभागाच्या मंत्री आणि अधिकाऱ्यांना फोनसह ईमेल वरून विचारणा करत असल्याची माहिती आहे. विद्यार्थ्यांच्या या मोहिमेमुळे काही मंत्री आणि अधिकाऱ्यांचे मेलबॉक्सही फुल झाल्याची चर्चा आहे. मात्र मंत्री आणि अधिकाऱ्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया किंवा शब्द देताना अडचणी येत असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. परिणामी अनेक मंत्री विद्यार्थ्यांचे फोन येताच, प्रश्न एकूण फोन कट करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. यात आरोग्य, गृह विभाग आणि शिक्षण विभागाला बहुतांश मेल प्राप्त झाल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचा मुद्दा आणि त्यावरून राज्याचं राजकारण तापण्याची शक्यता आहे.
 
आंदोलकांचा राजीनाम्यासाठी आग्रह,पण सरकारनं चौकशी समिती नेमली
 
चौकशी होईपर्यंत अध्यक्ष भीमनवार सक्तीच्या रजेवर
 
भीमनवार यांच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समितीस दोन महिन्यांचा वेळ
 
दिलीप भोसले चौकशी समितीचे अध्यक्ष, तुकाराम मुंडेही समितीवर
 
एमपीएससीतील आजी-माजी अध्यक्षांपासून शिपायांपर्यंतच्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार
 
आंदोलकांवरील गुन्ह मागे घेण्याचं आश्वासन
 
तीन वर्षात 70 हजार रिक्त पदे भरु असं आश्वासन
 
2027 मध्ये होणाऱ्या गट क च्या पदांमध्ये वाढ करणार
 
मागण्या मान्य करत असलेल्या पत्रावर मुख्य सचिवांची सही
 
तहसिलदार भरतीत 60-40 ऐवजी 50-50 चा रेश्यो
 
आयोगाची सदस्य संख्या 11 पर्यंत वाढवली जाणार
 
एमपीएससीच्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच होणार
 
पोलीस भरतीसाठी एकच अभ्यासक्रम ठेवण्याचेही मान्य