मद्यप्रेमींना झटका! दारूबंदी कधीपर्यंत?

    दिनांक :21-Oct-2026
Total Views |
नागपूर,
nagpur-dry-day-graduate-election-2026राज्यात विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पाच जागांवर विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. ज्यामध्ये पुणे शिक्षक मतदारसंघ, पुणे पदवीधर मतदारसंघ, नागपूर पदवीधर मतदारसंघ, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघ अशा पाच मतदारसंघाचा समावेश आहे. दरम्यान या पाचही मतदारसंघात येत्या 23 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. येत्या 23 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजेपासून मतदानाला सुरुवात होणार आहे, मतदारांना सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. या पाच जागांसाठी एकून 182 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
 

mdya 
दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजे नागपूर पदवीधर मतदारसंघातर्गत येणाऱ्या सर्व जिल्ह्यांमध्ये पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व दारूचे दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 21 ऑक्टोबर म्हणजे आज सांयकाळी चार वाजेपासून ते 23 ऑक्टोबर सायंकाळी चारवाजेपर्यंत नागपूर पदवीधर मतदारसंघांतर्गत येणाऱ्या सर्व जिल्ह्यांमध्ये ड्राय डे असणार आहे. या काळात दारूची सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने निर्णय घेण्यात आला असून सर्व मद्यविक्रेत्यांनी नियमांचं पालन करावं, असं आवाहान प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. त्यामुळे या दोन दिवसांच्या काळात या भागांमध्ये पूर्णपणे ड्राय डे असणार आहे. दारू मिळणार नाहीये.