आ. कुणावार यांच्या नेतृत्वात कोहळेंच्या प्रचाराला गती

हिंगणघाटात विजय संकल्प मेळावा

    दिनांक :21-Oct-2026
Total Views |
हिंगणघाट,
nagpur-graduate-election-sudhakar-kohaleनागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचारार्थ आमदार समीर कुणावार यांच्या नेतृत्वाखाली भाजपा हिंगणघाट विधानसभेच्या वतीने स्थानिक पांडुरंग तुळसकर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट येथे विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या माध्यमातून निवडणूक प्रचाराचे नियोजन, संघटनात्मक समन्वय आणि पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या रणनीतीवर भर देण्यात आला.
 
kuna
 
यावेळी आ. समीर कुणावार, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते, माजी खासदार रामदास तडस, नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर, नगरसेवक किशोर दिघे, भाजपाचे ज्येष्ठ नेते भुपेंद्र शहाणे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. आ. कुणावार यांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे महत्त्व अधोरेखित केले. पदवीधरांचे प्रश्न, अपेक्षा, रोजगाराच्या संधी आणि शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित विषयांना प्रभावीपणे मांडण्याची आवश्यकता त्यांनी विशद केली. तसेच महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचारासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करून हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातून त्यांना अधिकाधिक मताधिय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
 
 
संघटनात्मक एकजूट, कार्यकर्त्यांचा समन्वय आणि मतदारांशी थेट संवाद या बाबींना केंद्रस्थानी ठेवून आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात निवडणूक प्रचारात सक्रिय सहभाग नोंदविण्याचा संकल्प व्यत केला. भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या सर्व घटकांनी समन्वयाने कार्य करत पदवीधर मतदारांपर्यंत उमेदवाराची भूमिका आणि विचार पोहोचविण्यावर यावेळी भर देण्यात आला. यावेळी तडस, गाते, डॉ. तुळसकर, उमेदवार कोहळे यांनीही निवडून देण्याचे आवाहन केले.
 
 
या प्रसंगी मानस विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वामन खोडे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा विद्याभारती विदर्भ प्रांताचे उपाध्यक्ष रमेश धारकर, नपचे माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, सिंदी रेल्वेच्या नगराध्यक्ष राणी कलोडे, हिंगणघाट नपचे उपाध्यक्ष निलेश ठोंबरे, प्रफुल बाडे, आकाश पोहाणे, संजय डेहणे, जिल्हा सचिव सोनू आर्या, अजय वानखेडे, उमेश तुळसकर यांच्यासह हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील मंडळ अध्यक्ष, महायुतीचे ज्येष्ठ नेते, प्रमुख पदाधिकारी, पदवीधर मतदार उपस्थित होते.