वचनाची पूर्तता न झाल्याने बलात्काराचा आरोप करणे अयोग्य

लग्नाचे आश्वासन देऊन शारीरिक संबंध; आरोपी डॉक्टरला सशर्त जामीन

    दिनांक :21-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
Nagpur Rape Case जवळपास तीन वर्षे प्रेमसंबंधानंतर दिलेले वचन पूर्ण न केल्यामुळे बलात्काराचा आरोप करणे अयोग्य आहे. आरोपीने वचनाची पूर्तता केली असती तर ठेवलेले शारीरिक संबंध सहमतीने ठेवल्याचा दावा केला असता. मात्र, वचनाची पूर्तता न झाल्यामुळे बलात्काराचा आरोप करणे अयोग्य आहे. त्यामुळे अत्याचारातील गुन्ह्यातील आरोपीला न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.
 
 

Nagpur Rape Case: Doctor Gets Conditional Bail in Promise of Marriage Case 
पीडिती २३ वर्षीय तरुणी पूनम (काल्पनिक नाव) सीताबर्डीतील एका नामांकित कंपनीच्या शोरुममध्ये नोकरीला आहे. ती बहिण आणि आईसह सदरमध्ये राहते. तिची ओळख फेसबुकवरुन आरोपी संजय सुधीर बिश्वास (३०, बिछुआ, मध्यप्रदेश) याच्याशी झाली. संजय हा डॉक्टर असून तो बिछुआ शहरात क्लिनिक चालवतो.२०२४ मध्ये नागपुरातील नातेवाईकांकडे आल्यानंतर दोघांची प्रत्यक्षात भेट झाली. त्यानंतर एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेतल्यानंतर मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. आरोपीने पीडितेसमोर विवाहाचा प्रस्तावही ठेवला होता; मात्र तिने सुरुवातीला त्याला नकार दिला होता.
मे २०२६ मध्ये पूनमच्या आईला पक्षाघात झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या वेळी पीडितेने मदतीसाठी डॉ. संजयला बोलावले. आरोपी नागपुरात आला आणि पूनमच्या घरी थांबला. दोघे घरात एकटे असताना आरोपीने लग्नाचे आश्वासन देत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. दुसऱ्या दिवशी त्याने पूनमच्या आईशी चर्चा करुन लग्नाचा प्रस्ताव ठेवला. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने विवाह होण्याची शक्यताही निर्माण झाली होती. त्याने पूनमला बिछुआ येथे भेटायला बोलावले. त्याने क्लिनिकमध्ये रात्रभर थांबण्यास सांगितले. त्यावेळीही त्याने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, त्यानंतर आरोपीने पीडितेशी बोलणे टाळत होता. पुढे आरोपीने संपर्क टाळल्याने पूनमने १ ऑक्टोबरला सदर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार सदर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६९ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
 
 
संमतीचा मुद्दा महत्वाचा
आरोपीचे वकिल अॅड. Nagpur Rape Case  प्रणित वैरागडे यांनी वकिलांनी दोघांमधील संबंध परस्पर संमतीने असल्याचा युक्तिवाद करत जामिनाची मागणी केली. दुसरीकडे, आरोपी स्थानिक रहिवासी नसून तपास सुरू असल्याने जामीन देऊ नये, अशी भूमिका सरकारी पक्षाने मांडली. पूनमनेही जामिनाला विरोध केला होता.
 
 
दोघांच्या संबंधांबाबतच्या आरोपांवरून प्रथमदर्शनी ते संमतीने असल्याचे दिसत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. तसेच दोन्ही बाजूंच्या पालकांची विवाहाला सहमती असल्याचेही आदेशात नमूद आहे. तथापि, संमतीचे स्वरूप, विवाहाचे आश्वासन आणि संबंधितांचे वर्तन या बाबींचा अंतिम निर्णय सुनावणीदरम्यान होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. पूनमला आरोपीकडून त्रास किंवा दबाव येण्याची शक्यता अटी घालून नियंत्रित करता येऊ शकते, असे नमूद करत न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला.
 
 

जामिनासाठी कठोर अटी
आरोपीला २५ हजार रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका आणि त्याच रकमेचा एक जामीनदार देण्याच्या अटीवर मुक्त करण्याचे आदेश देण्यात आले. आरोपपत्र दाखल होईपर्यंत आरोपीला पीडितेच्या निवासस्थानाच्या शहरात, गावात किंवा परिसरात जाण्यास तसेच प्रत्यक्ष किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तिच्याशी संपर्क साधण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रकरणाशी संबंधित व्यक्तींना धमकावणे, प्रलोभन देणे किंवा त्यांच्यावर दबाव आणणे, तसेच पुराव्यांमध्ये हस्तक्षेप करणे यासही मनाई आहे. आरोपींकडून अॅड. प्रणित वैरागडे यांनी बाजू मांडली.