... तर तू स्वतः संपशील

रामदास कदम यांची मनोज जरांगेंवर घणाघाती टीका

    दिनांक :21-Oct-2026
Total Views |
मुंबई
ramdas kadam मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वाद आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. जरांगे यांनी शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटातील नेत्यांकडून त्यांना प्रत्युत्तर दिले जात आहे. आता शिवसेना नेते रामदास कदम यांनी जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत त्यांच्या संपत्तीबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच, त्यांच्यावर गंभीर आरोपही केले आहेत.
 

ramdas kadam, manoj jarange patil, eknath shinde, maratha reservation, maratha protest, shiv sena, maharashtra politics, political controversy, 500 crore allegation, asset investigation, maharashtra news, breaking news, political statements, jarange patil latest news 
रामदास कदम यांनी जरांगे यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत त्यांच्यावर टीका केली. ‘बाथरूममध्ये जाऊन गुपचूप खातोस आणि सगळ्यांना फसवतोस,’ असा आरोप त्यांनी केला. याप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी करावी, अशी विनंतीही कदम यांनी केली. ‘तू कोणाची बदनामी करत आहेस? कोणाकडून सुपारी घेतली आहेस?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मराठा समाजाने न्याय मिळावा यासाठी जरांगे यांना पाठिंबा दिला; मात्र ते या पाठिंब्याचा गैरफायदा घेत असल्याचा आरोपही कदम यांनी केला. ज्या गावात जरांगे उपोषणाला बसले होते, तेथील गावकऱ्यांनी त्यांना हाकलून दिल्याचा दावाही त्यांनी केला.
एकनाथ शिंदे यांच्याविरोधातील जरांगे यांच्या भूमिकेवर टीका करताना कदम म्हणाले, ‘तू एकनाथ शिंदे यांना संपवायला निघाला असशील, तर तू स्वतः संपशील, हे लक्षात ठेव.’ जरांगे यांच्याकडे असलेल्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करताना ही संपत्ती कुठे आहे, कोणाच्या नावावर आहे आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर किती मालमत्ता आहे, याचीही चौकशी व्हावी, असे त्यांनी म्हटले.
 
 
जरांगे यांनी ५०० कोटी ramdas kadam रुपयांच्या मुद्द्यावर केलेल्या आरोपांचाही रामदास कदम यांनी उल्लेख केला. ‘दूध का दूध, पाणी का पाणी होऊ द्या. ५०० कोटींचा आरोप करतोयस, तर बाप दाखव आणि श्राद्ध घाल,’ अशा शब्दांत त्यांनी जरांगे यांना आव्हान दिले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करण्यावरूनही कदम यांनी आक्षेप घेतला. ‘तू जगाचा मालक आहेस का?’ असा सवाल करत त्यांनी जरांगे यांच्यावर निशाणा साधला.
दरम्यान, मराठा आंदोलनातील काही कार्यकर्तेही जरांगे यांच्या विरोधात भूमिका मांडताना दिसत आहेत. त्यांच्या उपोषणाच्या सुरुवातीच्या काळापासून सोबत असलेल्या काही महिला कार्यकर्त्यांनीही त्यांच्यावर आरोप केले असून, हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचल्याचे वृत्त आहे. रामदास कदम यांच्या टीकेला मनोज जरांगे पाटील काय उत्तर देतात, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.