मुंबई
salman khan बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. टायगर श्रॉफ प्रकरणानंतर चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. याच पार्श्वभूमीवर सलमान खानच्या सुरक्षेसंदर्भात महत्त्वाची घडामोड घडल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि आमिर खान यांच्या घरांचीही हल्लेखोरांकडून रेकी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बॉलिवूडमधील प्रमुख कलाकारांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.a