एसबीआयच्या ग्राहकांचा डेटा डार्क वेबवर

वैयक्तिक माहिती आणि कर्जाचे डिटेल्स लीक

    दिनांक :21-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली
sbi देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियावर सायबर हल्ला झाल्याचा दावा केला जात आहे. या सायबर हल्ल्यात बँकेच्या 3,897 ग्राहकांच्या नोंदी डार्क वेबवर उघड झाल्याचं एसबीआयने स्पष्ट केलं आहे. ग्राहकांची वैयक्तिक माहिती आणि कर्जाशी संबंधित तपशील या डेटामध्ये असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. त्यामुळे या माहितीचा वापर करून ग्राहकांना फसवणुकीच्या जाळ्यात ओढलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 

 sbi customer data allegedly leaked on dark web, 3,897 customer records exposed 
एसबीआयने या घटनेच्या चौकशीसाठी स्वतंत्र सायबर सुरक्षा संस्थेची नियुक्ती केली आहे. या घटनेचा बँकेच्या मुख्य व्यवसायावर, आर्थिक कामकाजावर किंवा सेवा सुरू ठेवण्याच्या क्षमतेवर मोठा परिणाम होण्याची अपेक्षा नसल्याचं बँकेने म्हटलं आहे.
ग्राहकांची कोणती माहिती लीक झाली?
प्राथमिक विश्लेषणानुसार, डार्क वेबवर उघड झालेल्या माहितीमध्ये ग्राहकांची नावे, मोबाइल क्रमांक, जन्मतारखा, ईमेल आयडी आणि निवासी पत्ते यांचा समावेश आहे. याशिवाय ग्राहकांची ओळख पटवणारे काही क्रमांक, कर्जाच्या नोंदी आणि अर्जाशी संबंधित तपशीलही उघड झाल्याचं सांगण्यात आलं आहे. सायबर सुरक्षा घडामोडींवर लक्ष ठेवणाèया उूलशीर्झीश्रीश या ट्विटर अकाउंटनुसार, डळीर्ळीीळा नावाच्या समूहाशी या हल्ल्याचा संबंध असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा प्रकार 16 ऑक्टोबर रोजी पहिल्यांदा समोर आल्याचंही या अकाउंटने म्हटलं आहे. या डेटामध्ये 3,75,000 उडत रकाने आणि 2,722 झऊऋ दस्तऐवज असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या आकड्यांचा अर्थ आणि त्यांचा 3,897 ग्राहकांच्या नोंदींशी नेमका संबंध काय आहे, हे स्वतंत्रपणे स्पष्ट होणं महत्त्वाचं आहे.
ग्राहकांना कसा धोका निर्माण होऊ शकतो?
सायबर गुन्हेगार लीक झालेल्या माहितीचा वापर करून ग्राहकांना बँकेच्या नावाने फोन करू शकतात. घधउ अपडेट, कर्जाची मंजुरी, खात्यातील अडचण किंवा व्यवहाराची पडताळणी अशा कारणांचा आधार घेत ग्राहकांकडून गोपनीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. वैयक्तिक तपशीलांचा वापर करून बनावट संदेश किंवा फसवे ईमेल पाठवले जाण्याचाही धोका आहे. मुंबईतील सायबर, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ वकील प्रशांत माळी यांनी ग्राहकांनी सावध राहण्याचं आवाहन केलं आहे.