मानोरा येथे समाधान शिबिरात १३० प्रमाणपत्रांचे वितरण

प्रलंबित महसुली प्रकरणांचा निपटारा

    दिनांक :21-Oct-2026
Total Views |
वाशीम,
shivaji-maharaj-samadhan-campसेवा संकल्प अभियानांतर्गत मानोरा येथील तहसील कार्यालयाच्या नवीन सभागृहात आयोजित तालुकास्तरीय छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरात विविध शासकीय सेवांचा लाभ देत एकूण १३० प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. शिबिराच्या अध्यक्षस्थानी कारंजाचे उपविभागीय अधिकारी कैलास देवरे होते.
 
 
cre
 
तहसीलदार राजेंद्र पाटील, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी ज्योती राजपुरोहित यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांनी शिबिराला प्रतिसाद दिला. शिबिरात प्रलंबित फेरफार नोंदींचा निपटारा व जिवंत सातबारा मोहिमेंतर्गत ४९, गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद ५, पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका ६, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र १, आधार कार्ड ९, जन्म-मृत्यू नोंदणी व प्रमाणपत्रे १५, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र १, सातबारा व ८-अ नोंदी ४३ आणि विमुक्त जाती व भटया जमातीचे जात प्रमाणपत्र १, अशा एकूण १३० प्रमाणपत्रे व नोंदींचा लाभ देण्यात आला.
 
 
शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविणे, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करणे आणि प्रशासकीय सेवा सुलभतेने उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. शिबिराच्या यशस्वितेसाठी तहसील कार्यालयासह विविध विभागांच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. तहसीलदार राजेंद्र पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
छायाचित्र - पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करतांना