सुभाष वडेकर यांना विदर्भ भूषण पुरस्काराने सहपत्नीक सन्मानित

    दिनांक :21-Oct-2026
Total Views |
उंबर्डा बाजार, 
subhash-wadekar-vidarbha-bhushan-awardशेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य व नाविन्यपूर्ण प्रयोग, तसेच सामाजिक व पर्यावरणीय शेतीच्या माध्यमातून बहुविध पद्धतीने उत्पन्न वाढविण्याची हमी व दृष्टिकोन समोर ठेवून परिसरातील शेतकर्‍यांना आपल्या ज्ञानाचा फायदा देणारे शेतकरी सुभाष वाडेकर यांना कृषिभूषण महाराष्ट्र एम्प्लॉई स्टार्टअप फेडरेशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय विदर्भभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 
 
tgb
 
या विशेष कार्यक्रमात आरोग्य व सामाजिक क्षेत्रात क्रांतिकारी करणारे पद्मश्री डॉ. रविंद्र कोल्हे व भूषण निकम, कृषिभूषण महाराष्ट्र एम्प्लॉई स्टार्टअप फेडरेशनचे चेअरमन व संचालक रोहित पाटील, रोहिणी पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे ललित दादा बहाळे (शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष), कैलास मोरे (कृषी संचालक) यांची उपस्थिती होती.