नागपूर,
sudhakarrao-kohale-nagpur-election-campaignनागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. सुधाकरराव कोहळे यांच्या प्रचाराने नागपूर शहरात वेग घेतला असून, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी विविध क्षेत्रांतील मान्यवर, शैक्षणिक संस्था, शिक्षक-प्राध्यापक आणि शासकीय कार्यालयांना भेटी देत व्यापक जनसंपर्क साधला. दिवसभरात विविध ठिकाणी भेटीगाठी घेत पदवीधर मतदारांशी संवाद साधत त्यांनी आपल्या प्रचाराची सांगता केली.या प्रचार दौऱ्यादरम्यान माजी राज्यपाल मा. श्री. बनवारीलाल पुरोहित, माजी खासदार मा. श्री. अजय संचेती, पद्मश्री मा. श्री. सत्यनारायण नुवाल, आमदार मा. श्री. अरुण लखानी, परमज्योती सर तसेच बुटीबोरीचे नगराध्यक्ष श्री. सुमित मेंढे यांच्यासह विविध मान्यवरांच्या भेटी घेऊन संवाद साधण्यात आला.दिवसाची सुरुवात सकाळी ९ ते १०.१५ या वेळेत मान्यवरांच्या भेटीगाठींनी झाली.
त्यानंतर सकाळी १०.३० वाजता सदर येथील SFS स्कूल, ११ वाजता सेंट मायकल स्कूल, ११.३० वाजता प्रोव्हिडन्स स्कूल आणि दुपारी १२ वाजता सेंट जोसेफ स्कूल येथे भेट देण्यात आली.वरच्युअल गॅलक्सी ला भेट देण्यात आली, या भेटींदरम्यान शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधण्यात आला.दुपारी १२.३० वाजता मॉरिस कॉलेज, १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, १.३० वाजता कोर्ट परिसर, २ वाजता WCL, २.३० वाजता AG कार्यालय आणि ३ वाजता MOIL येथे भेट देण्यात आली. त्यानंतर दुपारी ४ वाजता सरस्वती विद्यालयाला भेट देऊन शिक्षक, कर्मचारी व संबंधित प्रतिनिधींशी संवाद साधण्यात आला.या दौऱ्यात विविध क्षेत्रांतील पदवीधर मतदारांच्या अपेक्षा, शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्न तसेच कर्मचारी आणि व्यावसायिकांच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
भाजपा-महायुतीच्या माध्यमातून पदवीधरांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याचा आणि त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.प्रचाराच्या शेवटच्या दिवशी विविध मान्यवरांच्या भेटी, शैक्षणिक संस्थांमधील संवाद आणि शासकीय कार्यालयांतील जनसंपर्काच्या माध्यमातून श्री. सुधाकरराव कोहळे यांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. या व्यापक संपर्क मोहिमेतून भाजपा-महायुतीच्या प्रचाराला अंतिम टप्प्यात अधिक गती मिळाली.