महाराष्ट्रातील 'या' तुरुंगामध्ये लॉरेन्स टोळीचे सदस्य!

मुंबई आणि पुणे लॉरेन्स बिश्नोई टोळीसाठी हॉटस्पॉट बनला तरी कसा?

    दिनांक :21-Oct-2026
Total Views |
मुंबई
tiger-shroff-firing-bishnoi-gangबॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर बॉलिवूडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मुंबईत टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाला आणि तो थोडक्यात बचावला. लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य अनिल पंडित याने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळी देशभरातील अनेक राज्यांमध्ये दहशत पसरवत आहे.
 

lorence
 
पोलिसांच्या मते, या टोळीने विशेषतः महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे येथे आपले साम्राज्य विस्तारले आहे. गेल्या दोन वर्षांत अशा १० हून अधिक घटनांची नोंद झाली आहे. मुंबईत हाय-प्रोफाईल सेलिब्रिटींवर आणि पुण्यात व्यावसायिकांवर गोळीबार करण्यात आला आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीचे हस्तक मुंबईतील ५० वेगवेगळ्या तुरुंगांमध्ये बंद आहेत. महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे बिश्नोई टोळीसाठी हॉटस्पॉट कसे बनले आहेत, हे जाणून घ्या.
 
पोलिसांच्या अधिकृत गुन्हेगारी अहवालानुसार, २०२४ ते २०२६ दरम्यान पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा आरोप असलेले १० हून अधिक खंडणीचे गुन्हे दाखल झाले आहेत. परदेशात असलेले सूत्रधार, स्थानिक संपर्क आणि इतर राज्यांतून भाड्याने घेतलेल्या शूटर्सच्या भूमिकेची चौकशी सुरू आहे. काही प्रकरणांमध्ये आरोप दाखल करण्यात आले आहेत, तर काही प्रलंबित आहेत. बहुतेक प्रकरणांमध्ये लॉरेन्स बिश्नोईचा हस्तक, शुभम लोणकर याचे नाव समोर येते.
 
लॉरेन्स बिश्नोई गँगने सलमान खान, रणवीर सिंग, आमिर खान, रोहित शेट्टी, आयुष शर्मा, कपिल शर्मा, मुनवर फारुकी आणि टायगर श्रॉफ यांसारख्या बॉलिवूडमधील प्रमुख कलाकारांना धमक्या दिल्या आहेत. पंजाब आणि हरियाणातील अनेक प्रसिद्ध गायकांनाही धमकीचे फोन आले आहेत.