वाशीमच्या विराजचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कौतुक

    दिनांक :21-Oct-2026
Total Views |
वाशीम, 
viraj-shinde-inspire-manak-innovationभारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग व नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन यांच्या वतीने नवी दिल्ली येथील भारत मंडपममध्ये आयोजित १२ व्या राष्ट्रीय ‘इन्स्पायर मानक’ प्रदर्शनात देशातील उत्कृष्ट ६० नवकल्पनांमध्ये स्थान मिळविणार्‍या वाशिमच्या बालवैज्ञानिक विराज शिंदेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे विशेष कौतुक केले. ऑर्थोपेडिक दिव्यांगत्वावर मात करून मिळविलेल्या यशाबद्दल मुख्यमंत्र्यांनी विराजच्या पाठीवर कौतुकाची थाप देत ‘विराज, प्राउड ऑफ यू!’ या शब्दांत त्याचे अभिनंदन केले आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
 
 
viraj
 
विराजने ‘कणगी : अ ग्रेन प्रोटेटिव्ह केअर युनिट’ ही रासायनिक प्रक्रिया न करता धान्याचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने नाविन्यपूर्ण संकल्पना विकसित केली आहे. धान्याची सुरक्षितता आणि गुणवत्ता टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प उपयुक्त ठरू शकतो. या तंत्रज्ञानाद्वारे रसायनविरहित पद्धतीने फळे पिकविणे तसेच फळे व भाजीपाल्याच्या शुद्धीकरणाची शयताही विराजने मांडली आहे. राष्ट्रीय ‘इन्स्पायर मानक’ प्रदर्शनात एवढे मोठे यश मिळविणारा विराज हा वाशिम जिल्ह्यातील पहिलाच विद्यार्थी ठरला आहे. त्याच्या या कामगिरीचे जिल्हाधिकार्‍यांनी कौतुक करून हे यश जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असल्याचे नमूद केले. शिक्षणाधिकारी मंगला धुपे यांनीही विराजच्या नवकल्पनेचे कौतुक केले. कमी वयात शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा विचार करणारा प्रकल्प विकसित केल्याबद्दल त्यांनी विराजचे अभिनंदन केले.
 
 
राष्ट्रीय प्रदर्शनातील यशाबद्दल विराजचा नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते नुकताच गौरवही करण्यात आला. या प्रदर्शनात राष्ट्रीय स्तरावर यश मिळविणारा तो देशातील एकमेव ऑर्थोपेडिक दिव्यांग विद्यार्थी असल्याचे सांगण्यात आले. ‘कणगी’ प्रकल्पाच्या कामगिरीमुळे त्याला जपान दौर्‍याची संधी मिळण्याची शयता व्यक्त केली जात आहे.