हिंगणघाट,
wardha-shri-durga-mata-daud-2026स्थानिक श्रीदत्त मंदिर देवस्थान येथून ११ ऑटोबर ते २० ऑटोबर दरम्यान दररोज सकाळी ६ वाजता शहरात श्रीदुर्गा माता दौडचे आयोजन करण्यात आले होते. ही दौड शहरातील विविध दुर्गामाता मंदिरांपर्यंत काढण्यात आली. या दौडमध्ये शेकडो धर्मप्रेमी आणि श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्यांनी सहभाग घेतला.
या दौडचे विशेष आकर्षण म्हणजे, कार्यक्रमादरम्यान राष्ट्रप्रेमाचा अनोखा आदर्श घालून देत रोशन नागमोते यांची एक महिन्यांची मुलगी जिजाई, संदीप भोयर यांचा दोन महिन्यांचा मुलगा शिव आणि राकेश कवडे यांची एक महिन्यांची मुलगी मुक्ताई यांना ’देव, देश आणि धर्मासाठी’ समर्पित करण्यात आले. या देशप्रेमी निर्णयाचे उपस्थितांकडून प्रचंड कौतुक करण्यात आले.
या सोहळ्याला वर्धा जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत, नगराध्यक्ष नयना तुळसकर, नगरसेवक प्राची पाचखेडे, माजी नगरसेवक उमेश तुळसकर, डॉ. मोहन खेतल, वैशाली खेतल, डॉ. गंगाधर नाखले, सुरेश दविले, भारत स्वाभिमान वर्धा जिल्हा अध्यक्ष वसंत पाल, विहिंप प्रांत अध्यक्ष सुरेंद्र आगरे, विश्व हिंदू परिषद महामंत्री शरद कोनपत्तीवार, प्रशासकीय अधिकारी विशाल ब्राह्मणकर आणि ज्ञानेश्वर खडसे उपस्थित होते.
नगराध्यक्ष नयना तुळसकर यांनी आपली समृद्ध हिंदू संस्कृती आणि परंपरांचे रक्षण करण्यासाठी हिंदू समाजाने नेहमीच सतर्क व तत्पर राहणे काळाची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. वसंत पाल यांनी युवकांनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि आरोग्यासाठी व्यसनांचा सदैव त्याग करण्याचे आवाहन केले. जेठानंद राजपूत यांनी देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी आजच्या तरुण पिढीने अशा दुर्गामाता दौडसारख्या संस्कारक्षम उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे विचार व्यत केले. समारोपीय व्याख्यान हभप राजा महाराज यांनी केले.