अकोला,
akola-water-wastage-fineसंभाव्य पाणीटंचाईच्या पृष्ठभूमीवर पाणी वापरावा निर्बंध लावण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने पाण्याचा उपयोग करणार्या एक हॉटेल व्यवसायिकाला मनपाच्या पथकाने पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
महानगरपालिका क्षेत्रामध्ये संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता पाण्याचा अपव्ययावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये झोन निहाय पथके कार्यान्वीत करण्यात आले आहे.
या अनुषंगाने गुरुवार, २२ रोजी पुर्व झोनच्या पथकाव्दारे तपासणी दरम्यान रामदास पेठ येथील रॉय रीट्रिट हॉटेल येथे पाण्याचा अपव्यय होतांना आढळून आल्यावर व्यावसायिकावर ५ हजार रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आ
ली आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता पिण्याच्या पाण्याचे व भूगर्भातील पाण्याचे वापर गरजेनुसार अत्यंत काटकसरीने करून मनपा प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाव्दारे करण्यात आले आहे.