‘रॉंग साइड’ने जाणाऱ्याची मुजोरी; होमगार्डला मारहाण

होमगार्डने दुचाकीस्वाराला अडविल्याने वाद;

    दिनांक :22-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
home guard assaulted वाहतुकीचे नियम मोडून विरुद्ध दिशेने दुचाकी चालविणाऱ्या चालकाला अडवून जाब विचारल्याने संतप्त झालेल्या दुचाकीस्वाराने कर्तव्यावरील होमगार्डला शिवीगाळ करीत मारहाण केली. ही घटना १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पारडी परिसरातील हनुमान मंदिर चौकात घडली. याप्रकरणी पारडी पोलिसांनी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राजेंद्र संपत सम्रित (४२), रा. आनंदनगर, असे मारहाण झालेल्या होमगार्डचे नाव आहे. ते पारडी वाहतूक विभागात वाहतूक नियमनाचे कर्तव्य बजावत होते. २०१० पासून ते होमगार्ड दलात कार्यरत आहेत.
 

home guard assaulted 
 
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ ते ६.३० वाजताच्या सुमारास राजेंद्र सम्रित हनुमान मंदिर चौकातील यशोदा फरसाणजवळ वाहतूक नियमन करीत होते. त्यावेळी एमएच ४९ सीएच ५३४० क्रमांकाच्या दुचाकीचा चालक विरुद्ध दिशेने जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी दुचाकीस्वाराला थांबविले आणि नियमभंगाबाबत जाब विचारला. याचा राग आल्याने दुचाकीस्वार वसीम अयुब कुरेशी (४२), रा. साई कॉलनी, याने सम्रित यांच्याशी वाद घातला. त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली.home guard assaulted तसेच शासकीय कर्तव्य बजावण्यात अडथळा निर्माण केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. घटनेनंतर सम्रित यांनी पारडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कुरेशी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविला आहे.
वसुलीच्या प्रयत्नातून वाद ?
वाहतूक पोलिस तैनात असतानाही होमगार्डने दुचाकीचालकाला अडवून कारवाई करण्याबाबत दम दिला. त्यानंतर रॉंग साईडने दुचाकी चालविल्यामुळे दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी होमगार्डने पैशाची मागणी केली. त्यातूनच हा वाद उद्भवला, अशी चर्चा घटनास्थळावर दबक्या आवाजात होती. वाहतूक पोलिसांनी वाहनचालकावर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेणे अभिप्रेत असतानाही होमगार्डला ढालेसारखा वाहतूक पोलिसांनी वापर केल्याचे बोलले जाते.