ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आता ७५% गुणांची अट?

    दिनांक :22-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली,
driving-licence-new-rules-75-percentवाहन चालविण्याचा परवाना मिळवण्यासाठीची ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण होणे आता सोपे राहणार नाही. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ऑनलाइन सुरक्षित वाहन चालविण्याच्या अभ्यासक्रमासाठी किमान उत्तीर्ण गुण ६० टक्क्यांवरून ७५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे.
 

drive 
केंद्रीय मोटार वाहन नियमांमधील मंत्रालयाच्या मसुदा सुधारणांनुसार, सुरक्षित वाहन चालवण्यावरील हा ऑनलाइन कोर्स अंदाजे ३० मिनिटांचा असेल. तसेच, आधार-सत्यापित ऑनलाइन सेवांतर्गत निवडक वाहन चालविण्याच्या परवान्याशी संबंधित सेवांसाठी शुल्कमाफीचा प्रस्तावही आहे.
 
या मसुद्यात असाही प्रस्ताव आहे की, परवान्याच्या तपशिलातील बदलांसाठीच्या अर्जांवर १५ दिवसांच्या आत निर्णय घेतला जावा. अर्ज नाकारल्यास, त्याची कारणे देणे बंधनकारक आहे. याशिवाय, परवान्यावरील नाव आणि पत्ता बदलण्यासाठीचे शुल्क रद्द करण्याचा प्रस्ताव आहे.
 
या मसुद्यानुसार, आधार, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, ई-रेशन कार्ड आणि जन्म प्रमाणपत्र यांसारखी कागदपत्रे ओळख, वय आणि रहिवासाचा पुरावा म्हणून स्वीकारली जातील. याशिवाय, प्रत्येक नव्याने जारी केलेला आणि नूतनीकरण केलेला वाहन चालविण्याचा परवाना फॉर्म ७ अंतर्गत लॅमिनेटेड किंवा पीव्हीसी कार्डच्या स्वरूपात जारी करण्याचा प्रस्ताव आहे. मंत्रालयाने या मसुदा नियमांवर संबंधित घटकांकडून ३० दिवसांच्या आत आक्षेप आणि सूचना मागवल्या आहेत.