पहिली राष्ट्रकुल कबड्डी चॅम्पियनशिप उद्यापासून

    दिनांक :22-Oct-2026
Total Views |
अहमदाबाद,
kabaddi-championship अहमदाबादमध्ये २३ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान पहिली राष्ट्रकुल कबड्डी चॅम्पियनशिप आयोजित केली जाईल. नऊ दिवसांच्या या स्पर्धेत तेरा देश सहभागी होतील. आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाच्या मान्यतेने भारतीय हौशी कबड्डी महासंघाने आयोजित केलेल्या या चॅम्पियनशिपमध्ये २३ संघ आणि ४०० हून अधिक खेळाडू सहभागी होतील. स्पर्धेदरम्यान ६२ सामने खेळवले जातील. बुधवारी आयोजित एका कार्यक्रमात या चॅम्पियनशिपची औपचारिक घोषणा करण्यात आली. भारतीय पुरुष संघाचे कर्णधारपद सुरजीत सिंग भूषवणार असून, महिला संघाचे नेतृत्व निधी शर्मा करेल.
 
kabaddi-championship
 
या स्पर्धेत भारत, श्रीलंका, बांगलादेश, नायजेरिया, केनिया, टांझानिया, कॅनडा, सिंगापूर, मलेशिया, युगांडा, इंग्लंड, स्कॉटलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांचे संघ सहभागी होतील. दोन्ही गटांच्या उपांत्य फेरीचे सामने ३० ऑक्टोबर रोजी, तर अंतिम सामना ३१ ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल. अहमदाबादमध्ये पहिल्या राष्ट्रकुल कबड्डी चॅम्पियनशिपचे आयोजन करणे हा भारतीय कबड्डीसाठी अभिमानाचा क्षण आहे, असे एकेएफआयचे सचिव जितेंद्र प्राण सिंग ठाकूर यांनी एका निवेदनात म्हटले आहे.