राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव रविवारी

अरुणजी नेटके यांचे मार्गदर्शन

    दिनांक :22-Oct-2026
Total Views |
वाशीम,
guidance-from-arunji-netke राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वाशीम नगराच्या वतीने श्री विजयादशमी उत्सवाचे आयोजन रविवार, २५ ऑटोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात आले आहे. हा उत्सव वाशीम येथील जिल्हा क्रीडा संकुलात संपन्न होणार असून, यासाठी नागरिकांनी सहपरिवार उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
 
 
guidance-from-arunji-netke
 
हिंदू परंपरेत विजयादशमी या सणाला विशेष महत्त्व आहे. सामूहिक शक्ती, जागरण आणि उत्सवाचे प्रतीक असलेल्या या पावन पर्वानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वाशीम नगराच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मालेगाव नगरपंचायतीचे सेवा निवृत्त उपमुख्याधिकारी सुरेश आनंदराव राठोड उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख वक्ते म्हणून दिल्ली येथील विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री अरुण नेटके मार्गदर्शन करणार आहेत. विजयादशमी उत्सवाच्या निमित्ताने संघाचे विचार, सामाजिक एकात्मता आणि सांस्कृतिक परंपरेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.उत्सवाच्या दिवशी दुपारी ४ वाजता पथसंचलनाला सुरुवात होणार असून, ते उत्सवस्थळी येऊन संपन्न होईल. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता मुख्य कार्यक्रम होणार आहे. नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वाशीम नगराच्या वतीने नगर संघचालक दीपक जहागीरदार यांनी केले आहे.