मतदारांना ओळख पटविण्यासाठी १० पर्यायी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य

    दिनांक :22-Oct-2026
Total Views |
बुलढाणा, 
maharashtra-election-2026महाराष्ट्र विधान परीषदेच्या द्विवार्षिक पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक-२०२६ करीता भारत निवडणूक आयोगाने मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त खालील नमूद १० पर्यायी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत आदेश दिले आहेत, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार यांनी दिली.
 

doc 
 
भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी २१ ऑटोबर २०२६ च्या पत्राव्दारे सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना या १० पर्यायी कागदपत्रांबाबत कळविले आहे. यानूसार यामध्ये आधार कार्ड ड्रायव्हींग लायसन्स, पॅन कार्ड भारतीय पासपोर्ट, राज्य / केंद्र सरकार, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर खाजगी औद्योगिक संस्थांद्वारे त्यांच्या कर्मचार्‍यांना दिलेले सेवा ओळखपत्र, खासदार / आमदार / विधान परिषद सदस्य यांना दिलेली अधिकृत ओळखपत्रे, संबंधित शिक्षक / पदवीधर मतदारसंघातील मतदार ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत, त्या शैक्षणिक संस्थांनी जारी केलेले सेवा ओळखपत्र, विद्यापीठाद्वारा वितरीत मुळ पदवी / पदविका प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकार्‍याने दिलेले शारीरिक दिव्यांगत्वाचे मूळ प्रमाणपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने जारी केलेले युनिक डिसॅबिलीटी ओळखपत्र छायाचित्रासह मतदार ओळखपत्रान्वये मतदाराची ओळख पटत असेल तर मतदार ओळखपत्रातील किरकोळ विसंगती दुर्लक्षित करण्यात याव्यात.
 
 
तसेच, छायाचित्रासह मतदार ओळखपत्रावरील विसंगत छायाचित्रामुळे मतदाराची ओळख पटणे / पटविणे शय नसल्यास मतदारास वरील १० पर्यायी कागदपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार २३ ऑटोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. तरी सर्व मतदारांनी मतदार ओळखपत्र नसल्यास वरील १० पर्यायी कागदपत्रांपैकी एक ओळख पटविण्यासाठी दाखवून मतदानाचा आपला अमुल्य हक्क बजावावा, असे आवाहनही जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.