महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्येही उन्हाचा तडाखा

अनेक जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

    दिनांक :22-Oct-2026
Total Views |
मुंबई
maharashtra heatwave राज्यात ऑक्टोबर महिन्यातही उष्णतेचा कडाका कायम राहण्याची शक्यता असून, काही भागांत तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. गुजरातच्या परिसरात प्रतिचक्रवाताची स्थिती निर्माण झाल्याने तेथून महाराष्ट्राच्या काही भागांकडे वाहणारे कोरडे आणि उष्ण वारे तापमानवाढीस कारणीभूत ठरू शकतात. या पार्श्वभूमीवर राज्यातील काही जिल्ह्यांसाठी उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने काही ठिकाणी उष्ण व दमट हवामान, तर काही भागांत हलक्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
 

maharashtra heatwave 
 
 
मुंबई, ठाणे, पालघर आणि पनवेल परिसरात प्रत्यक्ष तापमानापेक्षा हवेतील दमटपणामुळे अधिक त्रास जाणवण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण किनारपट्टीवरील भागांत उकाड्यामुळे नागरिकांची अस्वस्थता वाढू शकते. त्यामुळे पाऊस किंवा हवामानात गारवा निर्माण होण्याची प्रतीक्षा करणाऱ्यांना आणखी काही काळ उष्ण आणि दमट वातावरणाचा सामना करावा लागू शकतो.
उत्तर महाराष्ट्रातीलmaharashtra heatwave  धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज आहे. या भागांत उष्णतेची तीव्रताही वाढू शकते. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी कोरडे आणि उष्ण हवामान राहण्याची शक्यता असली, तरी काही भागांत हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. पावसाबाबतची अनिश्चितता आणि वाढता उकाडा यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर परिसरातही उष्णतेची तीव्रता जाणवत असल्याचे हवामानविषयक विश्लेषणातून समोर आले आहे. विदर्भातदेखील तापमान वाढण्याची शक्यता असून, काही भागांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागू शकतो. पुढील दोन ते तीन दिवसांत विदर्भासाठी पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पावसाची अनिश्चितता कायम असल्याने शेती आणि पाणीटंचाईविषयीची चिंता अधिक गडद होण्याची शक्यता आहे.