गडचिरोली,
sudhakar-kohli नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी आरमोरी व कुरखेडा येथे शिक्षक, कर्मचारी आणि पदवीधर मतदारांशी संवाद साधून आढावा बैठका घेतल्या. याप्रसंगी भाजपा महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांना प्रथम पसंतीचे मत देऊन विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.
आरमोरी येथील प्रेरणा शिक्षण संस्थेद्वारे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय येथे बैठक पार पडली. यावेळी माजी आमदार कृष्णा गजबे, संस्थेचे अध्यक्ष मदन मेश्राम, सचिव प्रशांत मेश्राम, भाजपा तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, जिल्हा सचिव भारत बावनथडे, भाजयुमोचे जिल्हा महामंत्री अक्षय हेमके यांच्यासह भाजपा पदाधिकारी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
त्यानंतर कुरखेडा येथील श्री. गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालय, डी. के. महिला महाविद्यालय, श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, संस्कार फाये पब्लिक स्कूल, शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, स्वर्णदीप हायस्कूल तथा ज्युनिअर कॉलेज आणि विकास महाविद्यालय येथे भेट देऊन प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी व पदवीधर मतदारांशी संवाद साधण्यात आला. यावेळी निवडणुकीच्या नियोजनासह पदवीधरांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी माजी आमदार कृष्णा गजबे, प्राचार्य राजाभाऊ मुनघाटे, भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, ओबीसी नेते रवींद्र गोटेफोडे, भाजप युवा नेते सागर निरंकारी, प्राचार्य गेडाम, प्रा. नितीन काळबांधे, प्राचार्य नागेश फाये, संस्थापक पी. आर. आकरे, प्राचार्य आर. एम. अलगदेवे, प्राचार्य एस. वाय. कांबळे, विस्तारक बळी, विनोद नागपुरकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. या संवाद बैठकांच्या माध्यमातून पदवीधर मतदारांच्या अपेक्षा व प्रश्न जाणून घेत निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.